🚨 तडीपारीचा आदेश झुगारून शहरात फिरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला बिबवेवाडी पोलिसांनी केली अटक - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Wednesday, November 20, 2019

🚨 तडीपारीचा आदेश झुगारून शहरात फिरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला बिबवेवाडी पोलिसांनी केली अटक
💁‍♂ महाराष्‍ट्रात राष्ट्रपती राजवटीच्या पार्श्वभूमीवर बिबवेवाडी पोलिसांकडून आरोपींवर विशेष नजर ठेवण्यात येत असून तडीपार असूनही बिबवेवाडीत आलेल्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीविरुद्ध बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

👉 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
अप्पर इंदिरा नगर बिबवेवाडी परिसरात राहणारा रोहित उर्फ काळू राजू गाडे ( 21) हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी असून त्याला पुणे शहर,जिल्हा व पिंपरी चिंचवडमधून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले होते. पुणे जिल्ह्यात यायचे असल्यास सक्षम अधिकाऱ्याची परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र रोहित याने परवानगी घेतली नव्हती. तरीही तो गंगाधाम रोड,आईमाता मंदिराजवळ,बिबवेवाडी येथे आला होता. याबाबतची माहिती बिबवेवाडी पोलिस ठाण्यातील तपास पथकातील पोलिस शिपाई अमित पुजारी यांना मिळाली त्यांनीही माहिती बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांना कळवत त्यांच्या आदेशा नुसार व सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पावशे, सहायक पोलीस उप निरीक्षक शिंदे, पोलीस हवालदार रवींद्र चिपा, पोलीस शिपाई अमित पुजारी, कुलकर्णी, मोरे, शितोळे, शेंडगे, शिंदे तपास पथकातील पोलिसांनी तत्काळ धाव घेत मंगळवार सकाळी आईमाता मंदिर, गंगाधाम रोड, बिबवेवाडी येथून त्याला पकडण्यात आले. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता काहीच मिळाले नाही. तडीपार असतानाही त्याचे बिबवेवाडीत येण्यामागचे कारण गुलदस्त्यात असून याबाबत पोलिस अधिक चौकशी करत आहेत.
सदर घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे करीत आहेत.

🚨 सदरची कामगिरी,
अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर सुनील फुलारी, पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 सुहास बावचे, सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग सुनील कलगुटकर, बिबवेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार घाडगे यांच्या मार्गदर्शनानुसार व सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पावशे, सहाय्यक उपपोलीस निरीक्षक शिंदे, पोलीस हवालदार रवींद्र चिप्पा, पोलीस शिपाई अमित पुजारी, कुलकर्णी, मोरे, शितोळे, शेंडगे, शिंदे यांच्या तपास पथकाने केली आहे

Post Bottom Ad

#

Pages