😱 महर्षीनगर मध्ये नाल्यावरील पुलावर धोकादायक पद्धतीने उंच सीमाभिंतीचे बांधकाम - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Saturday, November 16, 2019

😱 महर्षीनगर मध्ये नाल्यावरील पुलावर धोकादायक पद्धतीने उंच सीमाभिंतीचे बांधकामभूषण गरुड :- महर्षीनगर येथील संत ज्ञानेश्‍वर शाळेशेजारील वाहणाऱ्या नाल्यावर असलेल्या पुलावर वीटकाम करून दोन्ही बाजूला चुकीच्या पद्धतीने धोकादायक उंच सीमाभिंत बांधण्यात येत आहे. सुशोभिकरणाच्या नावाखाली नाल्यावर धोकादायक बांधत असलेल्या सीमाभिंतीची चर्चा प्रभागात होत आहे. विशेष म्हणजे या बांधकामाबाबत अधिकारी वर्ग अनभिज्ञ आहेत.

💁‍♂ सीमाभिंतीच्या कामाला शेजारील महानगरपालिकेचे शाळेचे पाणी वापरले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. शासकीय अधिकाऱ्यांनी नाल्यावर सदर कुठलाही आधार नसलेली उंच सीमाभिंत बांधण्यास परवानगी दिलीच कशी? असा प्रश्‍न नागरिकांमधून उपस्थित होत आहे. दरम्यान, 25 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे उपनगर परिसरात सीमाभिंत पडून नुकसान झाले होते.

🗣 महर्षीनगर येथील वाहणाऱ्या नाल्यावर पूल आहे. तेथे सुरू असलेले भिंतीच्या कामाची पाहणी केली असून सदर काम तातडीने थांबविण्यात आले असून योग्य पद्धतीने पुढील काम करण्यास सांगण्यात येईल. अविनाश सपकाळ, सहाय्यक आयुक्त बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय

🗣 सदर जागी पुलावर उंच सीमाभिंतीचे असे काय काम चालू आहे इतकी उंच भिंत पुलावर का बांधत आहेत. याबद्दल काहीच माहीत नाही. याबद्दल अधिकाऱ्यानांकडून माहिती घेण्यात येईल. प्रवीण चोरबेले, नगरसेवक

🗣 महर्षीनगर येथे नाल्यावर पुलावर सुशोभिकरणासाठी व कचरा टाकू नये म्हणून सदर भिंत बांधत असून भिंतीची उंची कमी करण्यास सांगितले आहे. भिंतीला भक्कमपणा येईल असेच काम केले जाईल. राजश्री शिळीमकर,नगरसेविका

Post Bottom Ad

#

Pages