👌🏻👌🏻सराईत गुन्हेगाराने केलेल्या गोळीबारात गंभीर जखमी पोलिसांने मोठय़ा धाडसाने एका आरोपीला झडप मारुन पकडले - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Thursday, November 21, 2019

👌🏻👌🏻सराईत गुन्हेगाराने केलेल्या गोळीबारात गंभीर जखमी पोलिसांने मोठय़ा धाडसाने एका आरोपीला झडप मारुन पकडले💁‍♂ धुमस्टाईलने महिलांच्या गळ्यातील दागिने ओरबाडणाऱ्या श्रीरामपूर येथील सराईत गुन्हेगाराने केलेल्या गोळीबारात एक पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाला,  पोलिसांनी गोळीबार झाल्यानंतरही मोठय़ा धाडसाने एका आरोपीला झडप मारुन पकडले तर दुसरा आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला आहे. ही थरारक घटना बुधवारी दुपारच्या सुमारास शहरातील चितळी रस्त्यावर नगरपालिकेच्या व्यापारी संकुलासमोर घडली.

👉 सचिन लक्ष्मण ताके, ( वय ३२ राहणार शिरसगाव,श्रीरामपूर ) असे पोलिसांनी अटक केलेल्या सोनसाखळी चोराचे नाव आहे.

📢 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
शिर्डी, राहता, लोणी, संगमनेर या शहरात धुमस्टाईलने महिलांच्या गळ्यातील दागिने ओरबडणाऱ्या टोळीने गेल्या अनेक दिवसापासून धुमाकूळ घातला आहे. या टोळीला पकडण्यात पोलिसांना सातत्याने अपयश येत आहे. श्रीरामपूर येथील धुमस्टाईलने दागिने ओरबाडणाऱ्या  टोळीतील सराईत गुन्हेगार सचिन ताके व त्याचा साथीदार सांगळे(पूर्ण नाव नाही) हे दोघे काळ्या रंगाच्या अपाचे मोटारसायकल (क्र. एम.एच. १५ सी.एफ. ८२९९) वरुन गणेशनगरकडून चितळी रस्त्याने राहात्याकडे येत होते. राहाता शहरातील चितळी रस्त्यावर मंगल कार्यालयामध्ये विवाह समारंभ असल्याने महिलांची मोठय़ा प्रमाणात रस्त्याने वर्दळ होती. याचा फायदा घेत सोनसाखळी चोर करण्याच्या इराद्याने चितळी रस्त्यावर नगरपालिकेच्या व्यापारी संकुलासमोर मोटारसायकल थांबवून उभे असतांना या आरोपींचा चेहरा काळ्या स्कार्फने बांधलेला होता. यावेळी पोलीस कर्मचारी अजित पठारे व रशिद शेख येथून खासगी मोटारसायकलीवरून समन्स बजावणी करण्यासाठी नवनाथनगरकडे जात असताना त्यांना या दोन तरुणांचा संशय आला. त्यांनी तात्काळ या तरुणांजवळ जाऊन त्यांची चौकशी करण्यास सुरूवात करताच मोटारसायकलवर मागे बसलेल्या गुन्हेगाराने कमरेला असलेला गावठी कट्टयातून गोळीबार केला. सदर गोळी पोलीस कर्मचारी अजित पठारे यांच्या मानेला चाटून गेल्याने तो गोळीबारात गंभीर जखमी झाले. गोळीबार झाल्याने गर्दी जमताच पोलीस कर्मचारी रशिद शेख याने एका आरोपीला झडप घालून पकडले. याचा फायदा घेत एक आरोपी फरार होण्यास यशस्वी झाला. जखमी पोलीस शिपाई अजित पठारे याच्यावर येथील सरकारी रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी त्यास नगर येथे हलविण्यात आले आहे. पोलिस शिपाई रशिद शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहाता पोलीस ठाण्यात या आरोपीविरूद्ध खुनाचा प्रयत्न करणे व सरकारी कामात अडथळा आणणे या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔳 आरोपी सचिन ताके हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरूद्ध जिल्हयातील अनेक पोलीस ठाण्यात रस्तालूट, धुमस्टाईलने दागिने ओरबाडणे तसेच जबरी चोरी असे अनेक गुन्हे दाखल आहे.
याघटनेनंतर प्रभारी जिल्हा पोलीस प्रमुख सागर पाटील,श्रीरामपूरच्या अप्परपोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे यांनी घटनास्थळी भेट दिली.
दुसऱ्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.

Post Bottom Ad

#

Pages