💐🙏🏻 पुणे पोलिसांचे मुंबई २६/११ च्या हल्ल्यातील शहिदांना मानवंदना - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Tuesday, November 26, 2019

💐🙏🏻 पुणे पोलिसांचे मुंबई २६/११ च्या हल्ल्यातील शहिदांना मानवंदना🇮🇳भारत माता की जय…भारतीय संविधानाचा आम्ही आदर करु… असे म्हणत मुंबईमध्ये २६/११ ला झालेल्या हल्ल्यातील शहीद पोलीस अधिकारी व कर्मचा-यांना मानवंदना देण्यासाठी पुणे पोलीस दलासह पुणेकरही मोठया संख्येने सारसबागेत जमले. पोलीस बँडच्या ठेक्यामध्ये शहीद सैनिकांच्या शौर्याचे प्रतिक म्हणून उभारलेल्या स्तंभाला मानवंदना देत त्यांच्या हौताम्याला पुणे पोलिसांनी सलाम केला. तर, तब्बल ५ हजार चिमुकल्यांनी चित्रांच्या माध्यमातून शहीदांना चित्ररुपी श्रद्धांजली अर्पण केली. 


🚨 पुणे शहर पोलीस आणि शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्टतर्फे मुंबईमध्ये २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांच्या स्मरणार्थ सारसबागेमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमावेळी पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ.के. व्यंकटेशम्, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अप्पर पोलीस महानिरीक्षक अतुलचंद्र कुलकर्णी, पुण्याचे सहपोलीस आयुक्त रविंद शिसवे, महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, अतिरिक्त पोलीस आयुक्त सुनील फुलारी, अशोक मोराळे, संजय शिंदे, माजी विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रशेखर दैठणकर, कोंढवा वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे, स्वारगेट वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी, बिबवेवाडी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे, सर्व झोनचे पोलीस अधिकारी, कर्मचारी, सेवा मित्र मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड.नितीन झंझाड, शिरीष मोहिते, अमर लांडे, राजाभाऊ कदम, पुणे पीपल्स बँकेचे संचालक दिलीप दगडे, सचिन ससाणे, उमेश कांबळे, प्रशांत जाधव, विक्रांत मोहिते, अजय पंडित, हिमांशु मेहता, कुणाल जाधव, प्रद्युम्न पंडित, देविदास चव्हाण, सदाशिव कुंदेन, सागर पवार यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


🖍चित्रकला स्पर्धेचे यंदा ६ वे वर्ष होते. यावेळी भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचनही करण्यात आले. स्पर्धेतील सर्वोकृष्ट चित्रे पोलीस विभाग जतन करणार आहे. यंदा साहित्य कट्टयाच्या माध्यमातून उत्कृष्ट चित्रे देखील मांडण्यात आली होती. 

🗣 पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम् म्हणाले, मुंबईतील २६/११ च्या हल्ल्यातील शहीदांना आदरांजली वाहण्यासाठी पुणे शहरातील सर्व विभागांतील पोलीस पुढे आहोत. मुंबईत झालेली २६/११ ची घटना मोठी होती. कोणत्याही संकटाला तोंड देण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे. मुंबई हल्ल्यातील शहिदांना पोलीस बँडमधून आदरांजली वाहिली, त्याप्रमाणे बालचित्रकारांनी चित्रातून मानवंदना दिली आहे. 

📝 चित्रकला स्पर्धा पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व खुल्या गटासाठी आयोजित करण्यात आली. स्पर्धेत सहभाग घेणा-या प्रत्येकाला प्रशस्तीपत्रक देण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण विवेक खटावकर, संदीप गायकवाड, नितीन होले, वाहिद खान, संतोष महाडिक यांनी केले. स्वारगेट वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नायकवडी यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले. जादूगार भुजंग यांचे जादूचे प्रयोग देखील यावेळी आयोजित करण्यात आले होते. अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार, अ‍ॅड.गायत्री खडके, रुपाली चाकणकर, पल्लवी जावळे यांच्या हस्ते स्पर्धेचे पारितोषिक वितरण झाले. डॉ. मिलींद भोई यांनी सूत्रसंचालन केले.

Post Bottom Ad

#

Pages