🙏🏻 राज्यसभा खासदार संभाजीराजे भोसले यांच्या पत्रानंतर केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी मागितली माफी - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Saturday, November 23, 2019

🙏🏻 राज्यसभा खासदार संभाजीराजे भोसले यांच्या पत्रानंतर केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी मागितली माफी💁‍♂ महाराष्ट्राच्या आजच्या राजकीय परिस्थितीवर केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी एक पत्रकार परिषद घेतली. आणि त्या पत्रकार परिषदेत त्यांच्याकडून शिवरायांचा उल्लेख एकेरी झाला. त्यानंतर ते सोशल मीडियात चांगलेच ट्रोल झाले. मात्र त्यांनी आता माफी मागितली आहे.👉 आजकालच्या आचार आणि विचार शून्य राजकारण्यांनी महाराजांचं नाव राजकारणात वापरू नये अशी सर्व शिवभक्तांची भावना आहे. त्यामुळे केंद्रीय विधी व न्याय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी तात्काळ बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी राज्यसभा खासदार संभाजीराजे भोसले यांनी केली होती.

📢 छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांसाठी एक प्रेरणास्थान आहेत. येणाऱ्या प्रत्येक पिढ्या त्यांचा आदर करतील आणि करत राहतील. छत्रपती महाराज की जय!, असं ट्विट करत रविशंकर प्रसाद यांनी माफी मागितली आहे.

🗣 काही वेळापूर्वी मला रवी शंकर प्रसाद यांचा फोन आला. त्यांनी अनावधानाने तसा उल्लेख झाला असे सांगितले. स्वतःची चूक लगेच सुधारतो असे आश्वासनही दिले, असं छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितलं आहे.

Post Bottom Ad

#

Pages