📈 मार्केटयार्ड भुसार बाजारात आंबेमोहोर तांदळाची २५०० रुपये प्रतिक्विंटलने भाववाढ - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Monday, November 18, 2019

📈 मार्केटयार्ड भुसार बाजारात आंबेमोहोर तांदळाची २५०० रुपये प्रतिक्विंटलने भाववाढ💁‍♂ पुणे शहरात मार्केटयार्ड भुसार बाजारामध्ये आंबेमोहोर तांदळाची सुमारे २५०० रुपये प्रतिक्विंटलने भाववाढ झाली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात प्रतिक्विंटलचे भाव पहिल्यांदाच ७५०० रुपयांवर पोचले आहेत. किरकोळ बाजारातही किलोचा भाव ८० रुपयांवर पोचला आहे. आंबेमोहोर तांदळाचे सर्वाधिक उत्पादन मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेशमध्ये घेतले जाते. महाराष्ट्रात डिसेंबरमध्ये नवीन आंबेमोहोर तांदळाची आवक सुरू होते. डिसेंबरमध्ये आंबेमोहोरचे भाव ५००० रुपये प्रतिक्विंटल होते. महाराष्ट्रात येणाऱ्या एकूण आंबेमोहोर तांदळापैकी मध्य प्रदेशातून ८० टक्के, तर २० टक्के तांदूळ आंध्र प्रदेशातून येतो. 


👉 यंदा शेतकऱ्यांनी मागील वर्षीच्या तुलनेत आंबेमोहोरचे उत्पादन कमी करून, कोलम तांदळाचे उत्पादन जास्त घेतले. यंदा सुरवातीला लचकारी कोलम तांदळाचे भाव ४२०० ते ४३०० पर्यंत तर आंबेमोहोरचे भाव ४८०० ते ५००० रुपये क्विंटलला मिळाले होते. आंबेमोहोर तांदळाला जास्त उत्पादन खर्च येतो. तसेच उत्पादन मिळण्यासही अधिकचा वेळ लागतो. दोन्ही तांदळाच्या भावात फार मोठी तफावत नसते. त्यामुळे कोलम तांदळाच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. 

🗣 युरोप व अमेरिकेत सुगंधी आंबेमोहोरची निर्यात होत होती. त्यात यंदा सौदी अरब व बांगलादेश या राष्ट्रांकडून आंबेमोहोर तांदळाला मागणी राहिली. परदेशातून याला जास्त मागणी राहिल्याने यंदा विक्रमी भाववाढ झाली असल्याची माहिती जयराज आणि कंपनीचे संचालक व तांदळाचे व्यापारी राजेश शहा यांनी सांगितली.

Post Bottom Ad

#

Pages