💰कंटेनरने दिलेल्या धडकेत सुरक्षारक्षकाचा मृत्यूप्रकरणी त्याच्या पत्नीला नुकसानभरपाई देण्याचा आदेश; मोटार अपघात न्यायप्राधिकरण - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, November 24, 2019

💰कंटेनरने दिलेल्या धडकेत सुरक्षारक्षकाचा मृत्यूप्रकरणी त्याच्या पत्नीला नुकसानभरपाई देण्याचा आदेश; मोटार अपघात न्यायप्राधिकरण


💁‍♂ कंटेनरने धडक दिल्यामुळे दुचाकीवरून जात असलेल्या सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी त्याच्या पत्नीला 25 लाख 39 हजार 154 रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश मोटार अपघात न्यायप्राधिकरणाचे अध्यक्ष आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. अग्रवाल यांनी दिला आहे. 

👉 मिळालेल्या माहितीनुसार,
सुरक्षारक्षक विजय दत्ताराव शिंदे (वय 30) 28 नोव्हेंबर 2015 रोजी दुचाकीवरून तळवडेकडून निघोजकडे जात होते. त्या वेळी कंटेनरने त्यांना धडक दिली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. उपचारासाठी 4 लाख 59 हजार 69 रुपये खर्च आला. त्यांना दरमहा 10 हजार 605 रुपये पगार होता. नुकसानभरपाई मिळावी यासाठी त्यांची पत्नी सुरेखा यांनी ऍड. अनिल पटणी आणि ऍड. आशिष पटणी यांच्यामार्फत येथील मोटार अपघात न्यायप्राधिकरणात कंटेनरमालक आणि एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनीच्या विरोधात दावा दाखल केला होता. कंटेनरच्या परवान्याची मुदत संपली असल्याचे सांगत दावा फेटाळण्याची मागणी विमा कंपनीने केली होती. त्यानंतर चालकाकडे कंटेनरचा वैध परवाना असल्याचे निष्पन्न झाले. याच अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या बाळासाहेब गणेश खांडेकर (वय 22) यांना गंभीर दुखापत झाली होती. अपघातानंतर त्यांना नोकरीही गमवावी लागली. त्यांना 20 टक्के कायमस्वरूपी अपंगत्व आल्याचा निष्कर्ष काढत दावा दाखल करण्यात आला. त्यांना वार्षिक साडेसात टक्के व्याजाने 5 लाख 69 हजार 280 रुपये देण्याचा आदेश न्यायाधिकरणाने दिला.

Post Bottom Ad

#

Pages