🚨 दिवसा हॉटेलमध्ये वेटर तर रात्री अंधाराचा फायदा घेत वाहन चोरी करणाऱ्याला पोलिसांनी केली अटक - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Saturday, November 16, 2019

🚨 दिवसा हॉटेलमध्ये वेटर तर रात्री अंधाराचा फायदा घेत वाहन चोरी करणाऱ्याला पोलिसांनी केली अटक


💁‍♂ दिवसा हॉटेलमध्ये वेटर तर रात्री अंधाराचा फायदा घेत वाहन चोरी करणाऱ्या आरोपीला निगडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून 11 लाख रुपयांच्या 13 महागड्या दुचाकी आणि दोन मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. बुद्धदेव विष्णू विश्वास असं या आरोपीचं नाव असून तो मूळचा पश्चिम बंगालचा असल्याचं समजतंय. तसेच बुद्धदेवविरोधात विविध दहा पोलीस ठाण्यातील गुन्हेही यादरम्यान उघडकीस आले आहेत.

👉 निगडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांचे पथक गस्त घालत होतं. यावेळी पोलिस कर्मचारी रमेश मावसकर यांना त्यांच्या एका माहितगार व्यक्तीकडून थरमॅक्स चौकात एक संशयित इसम हा बुलेट गाडीवर फिरत असल्याचं ?समजलं. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहचत बुद्धदेवला ताब्यात घेतलं. यावेळी बुलेटबद्दल चौकशी केली असता, बुद्धदेवने उत्तर देणं टाळलं. यानंतर पुढील चौकशीसाठी पोलिस ठाण्यात आणलं असता बुद्धदेवने पोलिसी खाक्यासमोर आपला गुन्हा मान्य केला. यावेळी बुद्धदेवने निगडी, वाकड, सांगवी, हिंजवडी, डेक्कन, देहूरोड या भागातून 13 दुचाकी व एक मोबाईल चोरल्याचे कबूल केले. त्यानुसार त्याच्याकडून 11 लाख रुपयांच्या ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. निगडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील टोनपे यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेप्रमाणे पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने कारवाई केली.

Post Bottom Ad

#

Pages