🏵 बाबा आमटेंचा बिल गेट्‌स यांच्या हस्ते होणार सन्मान - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Saturday, November 16, 2019

🏵 बाबा आमटेंचा बिल गेट्‌स यांच्या हस्ते होणार सन्मान
भूषण गरुड :- गडचिरोलीतील ‘लोकबिरादरी’ प्रकल्पासाठी ख्यातनाम असलेले डॉ. प्रकाश बाबा आमटे यांना ‘लाईफटाईम अचिव्हमेंट मेडेल’ने गौरवण्यात येणार आहे. बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे उपाध्यक्ष बिल गेट्स यांच्या हस्ते हा प्रतिष्ठेचा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येईल. 17 नोव्हेंबरला नवी दिल्लीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.


💁‍♂ आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्या  वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.  डॉ. प्रकाश आमटे यांच्या समवेत डॉ. सायरस पूनावाला, डॉ.किरण मझूमदार-शॉ यांनाही या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.


👉 गडचिरोलीतील लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून पत्नी डाॅ. मंदाकीनी आमटे यांच्यासमवेत डाॅ. प्रकाश आमटे कित्येक वर्ष आदिवासी आणि दुर्लक्षित घटकांना वैद्यकीय सुविधा देण्याचे काम करत आहेत. आमटे दाम्पत्याचा याआधी प्रतिष्ठित रेमन मॅगेसेसे पुरस्कारानेही गौरव करण्यात आला आहे.

🔹 डॉ. प्रकाश आमटे यांना महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठानं ‘डॉक्टर ऑफ लिटरेचर’ (डी. लिट) पदवीनं गौरवान्वित केलं आहे. आता राष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा ‘हेमालकसा’ प्रकल्पाची या पुरस्काराने दखल घेतली गेली आहे.

Post Bottom Ad

#

Pages