😱 भरधाव टेम्पोने दिलेल्या धडकेमध्ये वैद्यकीय महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Monday, November 25, 2019

😱 भरधाव टेम्पोने दिलेल्या धडकेमध्ये वैद्यकीय महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू💁‍♂ भरधाव टेम्पोने दिलेल्या धडकेमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या महाविद्यालयीन तरुणीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज, सोमवारी दुपारी 12:30 वाजता कात्रज येथील राजीव गांधी उद्यानाजवळ घडली. या अपघातामुळे कात्रज चौकात वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळाली.

👉 एकता प्रभाकर कोठावदे (वय 29) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. अपघातानंतर टेम्पोचालक फरार झाला.

🚨 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
एकता कोठावदे ही एका महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेते. ती शनिवारवाडा परिसरात राहते. आज ती कात्रजहून स्वारगेटकडे येत असताना कात्रज येथील राजीवगांधी उद्यानाजवळ पाठीमागून आलेल्या टेम्पोने तिला धडक दिली. या धडकेत ती गंभीर जखमी झाली. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या अपघातामुळे सातारा रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती.

सदर घटनेचा पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करीत आहेत.

Post Bottom Ad

#

Pages