😱 विदेशी नागरिकाने कोंढवा पोलीस स्टेशन मध्ये हैदोस घालत केली संगणकाची तोडफोड - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, November 24, 2019

😱 विदेशी नागरिकाने कोंढवा पोलीस स्टेशन मध्ये हैदोस घालत केली संगणकाची तोडफोड💁‍♂ विदेशी नागरिक पिंपळे सौदागर ते उंड्री कोंढवा याठिकाणी उबेर टॅक्सीने प्रवास करत असताना. टॅक्सी मध्ये धूम्रपान करताना उबेर चालकाने धुम्रपान करण्यास मज्जाव केल्याने विदेशी नागरिकाने रागाने उबेर चालकाला मारहाण करत शिवीगाळ केली याप्रकरणी उबेर टॅक्सी चालकाने कोंढवा पोलीस स्टेशनला माहिती दिली असता तेथील पोलिसांनी विदेशी नागरिकाला समजावण्याचा प्रयत्न केला असता. विदेशी नागरिकाने पोलिसांच्या अंगावर धावून जाऊन पोलिसांना अवार्च शब्दात बोलत संगणकाची तोडफोड केली आहे. याघटने प्रकरणी कोंढवा पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार संतोष नाईक यांनी फिर्याद दिली आहे.

👉 विदेशी नागरिक हा युगांडा देशाचा नागरिक आहे.

🚨 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
फिर्यादी कोंढवा पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार संतोष नाईक हे शुक्रवार दिनांक 22 नोव्हेंबर 2019 रोजी ड्युटी अंमलदार म्हणून काम करत असताना. दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास श्याम रत्नाकर तिडके (वय 27, रा. कोंढवा बुद्रुक,पुणे) यांनी कोंढवा पोलीस चौकी मध्ये येऊन सांगितले की, ते उबेर टॅक्सीचे चालक आहेत. उबेर टॅक्सी मध्ये विदेशी देशाचा नागरिक पिंपळे सौदागर येथून उंड्री, कोंढवा याठिकाणी भाडे घेऊन जात असताना. विदेशी नागरिक टॅक्सीमध्ये धुम्रपान करत होता. विदेशी नागरिकास धुम्रपान करण्यास मज्जाव केले असता. विदेशी नागरिकाने रागाने उबेर टॅक्सी चालकास हाताने मारहाण करत शिवीगाळ केली तसेच उबेर टॅक्सीचे स्टेरिंग देखील ओढत होता, अशी माहिती श्याम तिडके यांनी दिली. कोंढवा पोलिस चौकीतील अमलदार संतोष नाईक व तेथे जमलेले नागरिक पोलीस स्टेशनचे बीट मार्शल व कर्मचारी यांनी विदेशी नागरिकाला समजावण्याचा प्रयत्न केला असता. विदेशी नागरिकाने समंजसपणाने न घेता पोलिसांच्या अंगावर धावून येत शिवीगाळी करत होता. याप्रकरणी पोलीस चौकीचे ड्युटी अंमलदार यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार यांना फोन द्वारे घडलेल्या प्रकाराची माहिती देत मदतीसाठी बोलावले. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ कोंढवा पोलीस चौकी याठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार व पोलीस स्टाफ तेथे आले त्यांनी विदेशी नागरिकाला समजावण्याचा प्रयत्न केला असता. विदेशी नागरिक सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार  यांना अपशब्द बोलून धक्काबुक्की करू लागला. विदेशी नागरिकाचा स्वभाव उग्र झाल्याने त्याला शांत करण्यासाठी कोंढवा पोलीस स्टेशन याठिकाणी पोलिसांनी स्टाफच्या मदतीने नेले असता. विदेशी नागरिकाने कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये जोरजोरात आरडाओरडा करत स्वतःचे डोके फरशीवर आपटून घेत स्वतःला दुखापत करत पोलिस स्टेशनमधील संगणकाची तोडफोड करत 25 हजार रुपयाचे एकूण नुकसान केले आहे. विदेशी नागरिकांच्या डोक्याला दुखापत झाल्याने उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करत त्याचे मानसिक संतुलन ठीक आहे का? याची तपासणी केली असता तो ठिक असल्याची माहिती मिळाली आहे. याघटनेप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्याचे हवालदार संतोष नाईक यांनी फिर्याद दिली आहे.

🗣 विदेशी नागरिक हा युगांडा देशाचा नागरिक असल्याने युगांडा दूतावासाला याघटनेची माहिती देण्यात येत. विदेशी नागरिकाने पोलीस स्टेशनमध्ये हैदोस घालत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी कोंढवा पोलीस स्टेशन मध्ये 902/19 भा.द.वि.क 353, 427, 323, 504 नुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांनी दिली आहे.

🔴 सदर घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बि. मांजरे करत आहेत.

Post Bottom Ad

#

Pages