SBI बँकेचा प्रताप; एकाने पैसे टाकले, दुसऱ्याने मोदींनी पाठवले समजून काढले - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, November 24, 2019

SBI बँकेचा प्रताप; एकाने पैसे टाकले, दुसऱ्याने मोदींनी पाठवले समजून काढले🏦 मध्य प्रदेशच्या भिंडमध्ये एक धक्कादायक प्रकरण आले समोर, SBI च्या आलमपूर शाखेने मोठी चूक केली आहे. एकच बँक खाते दोन व्यक्तींना देण्याचा पराक्रम या बँकेने केला आहे. त्यामुळे झालेला गोंधळ चर्चेचा विषय बनला आहे.

🧾 आलमपूर शाखेने 2 खातेदारांना एकच खाते नंबर दिलाच त्याबरोबरच त्यांचा ग्राहक नंबरही एकच आहे. त्यामुळे एकजण खात्यामध्ये पैसे जमा करत, तर दुसरा ते पैसे काढत होता. हा प्रकार एक दोन वेळा नाही तर पूर्ण 6 महिने सुरु होता.

👷🏻‍♂ आलमपूरच्या रुरई गावात राहणाऱ्या हुकुम कुशवाह हे हरियाणामध्ये काम करतात. त्यांचे खाते आलमपूरच्या एसबीआयमध्ये आहे. हुकूम तेथून खात्यात पैसे जमा करत राहिले, त्यांनी जमा केलेल्यांपैकी 89 हजार रुपये दुसऱ्या खातेदाराने काढले. 

💸 हुकूम मध्यप्रदेशला आल्यानंतर पैसे काढण्यासाठी बँकेत गेले असता फक्त 35 हजार जमा असल्याचे समजले. हुकुम यांनी बँकेचे मॅनेजरकडे तक्रार केली. चौकशीत हुकुम सिंह आणि रोनी गावचा रामदयाल बघेल यांचा खाते क्रमांक एकच दिसून आला. 

🙈 हा प्रकार पाहून बँकेच्या अधिकाऱ्यांच्या तोंडचे पाणीच पळाले. त्यांनी बघेल यांना बोलावून घेत घडलेला प्रकार सांगितला. यावेळी बघेलने त्यांना 3 टप्प्यांमध्ये पैसे देण्याचे कबूल केले.

🗣 बघेल याने सांगितले की, माझे खात्यामध्ये पैसे येत होते. मला वाटले पंतप्रधान नरेंद्र मोदी पैसे पाठवत आहेत. यामुळे मी गरज पडेल तसे पैसे काढत होतो.

Post Bottom Ad

#

Pages