📉 Vodafone-Idea, Bharti Airtel lose Rs 74,000 crore to big telecom companies - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Saturday, November 16, 2019

📉 Vodafone-Idea, Bharti Airtel lose Rs 74,000 crore to big telecom companies
📉 व्होडाफोन-आयडिया, भारती एअरटेल या बडय़ा टेलिकॉम कंपन्यांना एकूण 74 हजार कोटींचा तोटा

⚖ सर्वोच्च न्यायालयाने समायोजित महसुलाबाबत (एजीआर) दिलेल्या आदेशानंतर व्होडाफोन-आयडिया, भारती एअरटेल या बडय़ा टेलिकॉम कंपन्यांच्या भवितव्यापुढे प्रश्न उभा राहिला आहे. या कंपन्यांना दुसऱया तिमाहीत कॉर्पोरेट इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा म्हणजेच एकूण 74 हजार कोटींचा तोटा सोसावा लागला आहे. याचा फटका 70 कोटींहून अधिक ग्राहकांना बसण्याची शक्यता आहे.

🔴 सर्वोच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात दूरसंचार विभागाने टेलिकॉम कंपन्यांकडे अधिभार आणि व्याजाच्या रूपात 13 अब्ज डॉलर रुपयांची केलेली मागणी योग्य असल्याचा निकाल दिला होता. त्याचा टेलिकॉम कंपन्यांना मोठा झटका बसला आहे. व्होडाफोन-आयडियाला दुसऱया तिमाहीत 50,921 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. गेल्या वर्षीच्या दुसऱया तिमाहीत या कंपनीला 4.947 कोटींचा तोटा झाला होता. समायोजित महसुलाची थकीत रक्कम भरण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे भारती एअरटेलला जुलै-सप्टेंबर या तिमाहीत 23,045 कोटींचा तोटा सोसावा लागला आहे. विशेष म्हणजे या कंपनीला गेल्या वर्षी याच तिमाहीत 119 कोटी रुपयांचा नफा झाला होता.

😱 … तर व्होडाफोन दिवाळखोरीत जाणार
सरकारने समायोजित महसुलाच्या (एजीआर) 39 हजार कोटींहून अधिक रुपयांच्या वसुलीबाबत मोठा दिलासा दिला नाही तर आम्ही कंपनीत आणखी गुंतवणूक करणार नाही, असे आदित्य बिर्ला समूहाने गेल्या आठवडय़ात स्पष्ट केले होते. अशा परिस्थितीत व्होडाफोन-आयडिया कंपनी दिवाळखोरीत जाण्याची शक्यता आहे.

👉 ट्रायच्या ताज्या आकडेवारीनुसार व्होडाफोन-आयडियाचे 37.5 कोटी तर भारती एअरटेलचे 32.79 कोटी ग्राहक आहेत. तसेच रिलायन्स जिओची ग्राहक संख्या 34.8 कोटी आहे.

Post Bottom Ad

#

Pages