🚨 अग्निशस्त्र जवळ बाळगणाऱ्या इसमास कोंढवा पोलिसांनी केले जेरबंद; 1अग्निशस्त्र व 3 जिवंत काडतूस केले जप्त - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Saturday, December 21, 2019

🚨 अग्निशस्त्र जवळ बाळगणाऱ्या इसमास कोंढवा पोलिसांनी केले जेरबंद; 1अग्निशस्त्र व 3 जिवंत काडतूस केले जप्त

🚨 अग्निशस्त्र जवळ बाळगणाऱ्या इसमास कोंढवा पोलिसांनी केले जेरबंद; 1अग्निशस्त्र व 3 जिवंत काडतूस केले जप्त

कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत अग्निशस्त्र (पिस्तूल) जवळ बाळगत असल्याची बातमी दाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कोंढवा पोलिसांनी सापळा रचून संशयित इसमास ताब्यात घेत त्याच्याकडून 1 अग्निशस्त्र (पिस्तूल) व 3 जिवंत काडतुसे हस्तगत करत जप्त केली आहेत.

अग्निशस्त्र (पिस्तूल) जवळ बाळगणारा आरोपी अली अल्तमश रहमान शेख (वय 24, रा. सहारा अपार्टमेंट,नवाजिश पार्क,कोंढवा खुर्द,पुणे) यास कोंढवा पोलिसांनी अटक करत भारतीय हत्यार कायदा कलम 3(25) व मुंबई पोलीस अधिनियम कलम 37(1)(3) सह 135 प्रमाणे गुरन 990/19 अन्वये कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार,
पुणे शहर कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत बुधवार 18 डिसेंबर रोजी गस्त घालत असतांना कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई राकेश मारुती चव्हाण व पोलीस नाईक अमोल फडतरे (नेमणूक पी.ए.टी.सी कोंढवा पोलीस ठाणे पुणे शहर) यांच्या बातमीदारांनी मार्फत एक अज्ञात इसम जमजम हॉटेल, कोंढवा खुर्द याठिकाणी अग्निशस्त्र(पिस्तूल) जवळ बाळगत असल्याची खात्रीशीर बातमी मिळताच ही माहिती कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांना कळवत त्यांच्या मार्गदर्शनानुसार व सूचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक संतोष शिंदे,पोलीस शिपाई राकेश चव्हाण,पोलीस नाईक अमोल फडतरे यांना मिळालेल्या बातमीच्या आधारे जमजम हॉटेलच्या जवळ,भाजी मंडई रोडवर,कोंढवा खुर्द याठिकाणी सापळा रचून आरोपी अली अल्तमश रहमान शेख (वय 24, रा.सहारा अपार्टमेंट,नवाजिश पार्क,कोंढवा खुर्द,पुणे) यास ताब्यात घेत अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ 1अग्निशस्त्र (पिस्तूल) व 3 जिवंत काडतुसे जप्त करत अटक केली आहे. अग्निशस्त्र जवळ बाळगणार्‍या आरोपीच्या विरोधात भारतीय हत्यार कायदा कलम 3(25) व मुंबई पोलीस अधिनियम कलम 37(1)(3) सह 135 प्रमाणे गुरन 990/19 अन्वये कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संतोष शिंदे करीत आहेत.

सदरची कामगिरी,
मा.अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री.सुनील फुलारी.
मा.पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 पुणे शहर श्री.सुहास बावचे.
मा.साहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर श्री.सुनील कलगुटकर.
कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विनायक गायकवाड.
कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा श्री.महादेव कुंभार.
यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक संतोष शिंदे, पोलीस शिपाई राकेश चव्हाण, पोलीस नाईक अमोल फडतरे यांनी केली आहे.

Post Bottom Ad

#

Pages