🚨 जन्मठेपीची शिक्षा भोगून आलेल्या सराईत गुन्हेगाराकडून 1 गावठी कट्टा व 5 जिवंत काडतूसासह गुन्हे शाखा युनिट 2 ने केले जेरबंद - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Thursday, December 19, 2019

🚨 जन्मठेपीची शिक्षा भोगून आलेल्या सराईत गुन्हेगाराकडून 1 गावठी कट्टा व 5 जिवंत काडतूसासह गुन्हे शाखा युनिट 2 ने केले जेरबंद

🚨 जन्मठेपीची शिक्षा भोगून आलेल्या सराईत गुन्हेगाराकडून 1 गावठी कट्टा व 5 जिवंत काडतूसासह गुन्हे शाखा युनिट 2 ने केले जेरबंद

पुणे शहर बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीत रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार गावठी कट्टा घेऊन थांबला असल्याची गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट 2 ने जन्मठेपीची शिक्षा भोगून आलेल्या सराईत गुन्हेगारास सापळा रचून ताब्यात घेत त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला 1 गावठी कट्टा व 5 जिवंत कडतुसे जप्त करून सराईत गुन्हेगारस अटक केली आहे.

रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार इक्बाल सोनप हयात अन्सारी (वय 38, रा. कोपरआळी, लोहगाव,पुणे) याला गुन्हे शाखा युनिट 2 ने अटक केली आहे.

पुणे शहर गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार,
पुणे शहर व शहरालगतच्या हद्दीत गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई करून त्यांच्या हातून कोणताही गुन्हे घडू नये म्हणून सतर्क राहून रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर पाळत ठेवून त्यांना वेळोवळी चेक करून गुन्हा करण्याच्या तयारीत असल्यास तात्काळ जेरबंद करण्याबाबत अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा श्री.अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा श्री.बच्चन सिंह, साहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा डॉ.शिवाजी पवार व श्री. विजय चौधरी यांच्या आदेशाप्रमाणे गुन्हे शाखा युनिट 2 चे प्रभारी अधिकारी महेंद्र जगताप यांनी दिलेल्या आदेशानुसार गुन्हेगारांचा शोध घेत असतांना बुधवार दि. 18 डिसेंबर रोजी गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलीस नाईक यशवंत खंदारे बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना खात्रीशीर बातमीदारकडून माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार इक्बाल सोनप हयात अन्सारी (वय 38, रा. कोपरआळी, लोहगाव,पुणे) हा लोहगाव पी.एम.पी.एम.एल बस स्टॉप येथे गावठी कट्टा घेवून थांबला असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखा 2 चे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांना कळवत त्यांच्या मार्गदर्शनानुसार व सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव, पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह शेळके, सहाय्यक पोलीस फौजदार यशवंत आंब्रे, पोलीस नाईक - यशवंत खंदारे,अतुल गायकवाड, पोलीस शिपाई - कादिर शेख,मितेश चोरमोले यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर ठिकाणी जावून सापळा रचून सराईत गुन्हेगाराला शिताफीने ताब्यात घेत व पंचासमक्ष सराईत गुन्हेगाराची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला गावठी कट्टा व 5 जिवंत कडतुसे असे एकूण 16 हजार 250 रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आलेला आहे. सराईत गुन्हेगाराची सखोल चौकशी केली असता हा मुंबई अंधेरी एमआयडीसी पोलीस स्टेशन कडील खूनाच्या गुन्हयात जन्मठेपीची शिक्षा भोगून सुमारे 1 वर्षापूर्वी सुटून आलेला होता अशी माहिती मिळाली.
याबाबत, विमानतळ पोलीस स्टेशन गुरनं 418/2019 आर्म एक्ट 3(25) सह 37(3) (3) सह 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई,
मा.अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा श्री.अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा श्री.बच्चन सिंह, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा डॉ.शिवाजी पवारश्री.विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेप्रमाणे गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव, पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह शेळके, सहाय्यक पोलीस फौजदार यशवंत आंब्रे, पोलीस नाईक - यशवंत खंदारे,अतुल गायकवाड, पोलीस शिपाई - कादिर शेख,मितेश चोरमोले यांच्या पथकाने केली आहे.

Post Bottom Ad

#

Pages