🚨तरूणीचा खून केल्याप्रकरणी सिंहगडरोड पोलिसांनी तरूणीसह दोघांना केली अटक; तिघांना 10 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Friday, December 6, 2019

🚨तरूणीचा खून केल्याप्रकरणी सिंहगडरोड पोलिसांनी तरूणीसह दोघांना केली अटक; तिघांना 10 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी



💁‍♂एमबीए झालेल्या तरूणीचा खून केल्याप्रकरणात सिंहगडरोड पोलिसांनी तरूणीसह दोघांना अटक केली. त्या तिघांना 10 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

👉तेजसा श्‍यामराव पायाळ (वय 29) ही सिंहगड रोड परिसरात सोमवारी (दि. 2) मृतावस्थेत आढळून आली होती. त्यावेळी संपूर्ण शहरात खळबड उडाली होती. शवविच्छेदन अहवाल आणि पोलिसांनी केलेल्या तपासात तिचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी पियुष नितीन संचेती (वय 34, रा. सहकारनगर, तुळशीबागवाले कॉलनी), वसंतकुमार प्रभाकर गौडा (वय 31, रा. बेंगलोर) आणि सोनल सुनील सदरे (वय 29, रा. आंबेगाव बुद्रुक) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. सहायक पोलीस निरीक्षक सतिश उमरे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

🚨पोलिसांनी तिघांना न्यायालयात हजर केले. त्यावेळी सहायक सरकारी वकील राजश्री कदम यांनी तिघांना पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. घटनेच्यास्थळी तिघे उपस्थित असल्याचे सीसीटीव्ही वरून निष्पन्न झाले आहे. तिघांकडून सांगण्यात येणाऱ्या कथनामध्ये विभिन्नता आहे. मयत तरूणीचा मोबाइल घटनास्थळी आढळून आलेला नाही. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तो लपवून ठेवला असण्याची शक्‍यता असून, याबाबत तपास करण्यासाठी, घटनेनंतर फ्लॅटला कुलूप लावण्यात आले होते. चावीबाबत तपास करणे, मयताच्या अंगावर जखमा आढळून आल्या आहेत. त्या कशाच्या सहाय्याने केल्या, याचा शोध घ्यायचा आहे. नक्की कोणत्या कारणासाठी हे कृत्य केले. त्यांनी एकत्र दारू, हुक्काचे सेवन केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. दारू, हुक्का कोठून आणला, त्यांचे आणखी कोणी मित्र आहेत का, याबाबत तपास करण्यासाठी तिघांना पोलीस कोठडी देण्याची मागणी ऍड. कदम यांनी केली. ती न्यायालयाने ग्राह्य धरत वरील आदेश दिला.

Post Bottom Ad

#

Pages