🔯 राशी भविष्य :- गुरुवार, दिनांक - 12 डिसेंबर 2019 - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Thursday, December 12, 2019

🔯 राशी भविष्य :- गुरुवार, दिनांक - 12 डिसेंबर 2019


🔯 राशी भविष्य :- गुरुवार, दिनांक - 12 डिसेंबर 2019
🔯 राशी फल
1. मेष :- तुम्हाला राजकीय क्षेत्रात यश येईल. वैवाहिक जीवनात सुख-शांतता राहील. आयटी आणि मीडिया क्षेत्रातील लोकांना नवनवीन संधी उपलब्ध होतील. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. लव्ह लाईफ चांगली राहील. आजचा शुभ रंग : पांढरा
2. वृषभ :- वायफळ खर्च करणं टाळा. अनेक दिवसांपासूनची प्रलंबित कामं पूर्ण होतील. कुटुंबात अनुकूल वातावरण राहील. समाजात मान-सन्मान मिळेल. दाम्पत्यांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग : हिरवा.
3. मिथुन :- विद्यार्थ्यांची शिक्षणात प्रगती होईल. व्यापार आणि नोकरीत आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. प्रेमळ व्यक्तीच्या भेटीमुळे, मन प्रसन्न होईल. आरोग्य निरोगी राहील. भगवान श्री गणेशाची पूजा करा. आजचा शुभ रंग : निळा
4. कर्क :- आजचा संपूर्ण दिवस तुमच्यासाठी संघर्षमय राहील. आयटी आणि बॅंकिंग क्षेत्रातील लोकांना आपल्या कार्यात यश येईल. उच्चवर्गीय पदाधिकाऱ्यांकडून चांगलं सहकार्य मिळेल. अनपेक्षित खर्च करणं टाळा. आजचा शुभ रंग : पिवळा
5. सिंह :- भगवान श्री गणेशाची पूजा-अर्चना करा. आरोग्य निरोगी राहील. कुटुंबातील व्यक्तींमध्ये सुखाचे वातावरण असेल. धनलाभ होईल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष केंद्रित होईल. प्रतिस्पर्धींवर विजय मिळवू शकता. आजचा शुभ रंग : लाल
6. कन्या :- नवीन कामाची सुरूवात आज करू शकता. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळेल. लव्ह लाईफमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. सकारात्मक गोष्टींमुळे, मन स्थिर राहील. आजचा शुभ रंग : निळा
7. तूळ :- पोटाचे विकार संभावतील. जीवनसाथीसोबत बाहेर फिरायला जाऊ शकता. मित्र-मैत्रिणींची भेट होईल. लव्ह लाईफ उत्तम राहील. नकारात्मक विचारांपासून दूर रहा. घरातील महत्त्वाच्या कामात व्यस्त व्हाल. आजचा शुभ रंग : हिरवा
8. वृश्चिक :- नोकरीत पदोन्नती होईल. दाम्पत्यांमध्ये अनुकूल वातावरण राहील. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. लेखन आणि साहित्यिक क्षेत्रात तुमची गोडी निर्माण होईल. आजचा शुभ रंग : पांढरा
9. धनु :- आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. कोर्ट-कचेरीची प्रलंबित कामं पूर्ण होतील. वैवाहिक जीवन आनंदीत राहील. मित्रपरिवारांसोबत धार्मिकस्थळी भेट देण्यास जाऊ शकता. तुमचा प्रवास सुखाचा होईल. आजचा शुभ रंग : निळा
10. मकर :- राजकीय क्षेत्रात  यश मिळाल्यामुळे, तुमचा आत्मविश्वास वाढेल. इतरांशी व्यवहार करताना, काळजी घ्या. आरोग्य निरोगी राहील. विद्यार्थ्यांना शिक्षणात नवीन संधी उपलब्ध होतील. आजचा शुभ रंग : पांढरा
11. कुंभ :- व्यापारात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. बॅंकिंग आणि मार्केटिंग क्षेत्रातील लोकांना कठिण परिश्रम घ्यावे लागतील. कोणताही महत्त्वाचा निर्णय आज घेऊ नका. आजचा शुभ रंग : नारंगी
12. मीन :- जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. वैचारीकदृष्ट्या गोष्टींमुळे, मनात चिंता सतावत राहील. मित्रपरिवारांसोबत पर्यटनस्थळी भेट देण्यास जाऊ शकता. आजचा शुभ रंग : पिवळा

Post Bottom Ad

#

Pages