🔯 राशी भविष्य :- शुक्रवार, दिनांक - 13 डिसेंबर 2019 - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Friday, December 13, 2019

🔯 राशी भविष्य :- शुक्रवार, दिनांक - 13 डिसेंबर 2019


🔯 राशी भविष्य :- शुक्रवार, दिनांक - 13 डिसेंबर 2019
🔯 राशी फल
1. मेष :- आयटी आणि बॅंकिंग क्षेत्रातील प्रलंबित कामं पूर्ण होतील. व्यापारात आर्थिक लाभ होईल. कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे. प्रेमळ व्यक्तीची भेट होईल. मन अस्थिर राहील. भगवान श्री गणेशाची पूजा करा. आजचा शुभ रंग : पांढरा.
2. वृषभ :- कामा-धंद्यात वाढ होईल. मित्रपरिवारांसोबत बाहेर फिरायला जाऊ शकता. मार्केटिंग क्षेत्रात प्रगती झाल्यामुळे, उच्चवर्गीय अधिकाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळेल. लव्ह लाईफ उत्तम राहील. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष केंद्रित होईल. आजचा शुभ रंग : हिरवा.

3. मिथुन :- वायफळ खर्च करणं टाळा. विद्यार्थ्यांना शिक्षणात नवनवीन संधी उपलब्ध होतील. विवाहीत जीवनात सुख-शांतता राहील. दाम्पत्यांमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग : निळा.
4. कर्क :- तुमच्या प्रत्येक कार्यात यशप्राप्त होईल. प्रतिस्पर्धींवर विजय मिळवू शकता. नोकरी आणि व्यवसायात कठिण परिश्रम घ्यावे लागतील. अनिद्रामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. अनपेक्षित खर्च करू नका. आजचा शुभ रंग : पिवळा.
5. सिंह :- आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. कुटुंबात अनुकूल वातावरण राहील. बॅंकिंग आणि मीडिया क्षेत्रातील लोकांना आपल्या कार्यात यश मिळेल. घरातील महत्त्वाचा निर्णय आज घेऊ शकता. धनलाभ होईल. गृहस्थजीवन आनंदीत राहील. आजचा शुभ रंग : लाल.
6. कन्या :- एखाद्या नवीन कामाची सुरूवात आज करू शकता. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळेल. लव्ह लाईफमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. सकारात्मक गोष्टींमुळे, मन स्थिर राहील. आजचा शुभ रंग : निळा.
7. तूळ :- विद्यार्थ्यांची शिक्षणात प्रगती होईल. लव्ह लाईफ चांगली राहील. धार्मिक कार्यात व्यस्त व्हाल. अनेक दिवसांपासूनची प्रलंबित कामं पूर्ण होतील. गरीबांना दानधर्म करा. बाहेरील खाद्यपदार्थ खाणे शक्यतो टाळा. आजचा शुभ रंग : हिरवा.
8. वृश्चिक :- भगवान श्री गणेशाची पूजा करा. विवाह करण्यासाठी चांगला योग आहे. जीवनसाथीसोबत पर्यटनस्थळी भेट देण्यास जाऊ शकता. नकारात्मक विचारांपासून दूर रहा. आजचा शुभ रंग : पांढरा.
9. धनु :- व्यापारात धन आगमन झाल्यामुळे, मन प्रसन्न होईल. नोकरीत पदोन्नती होईल. आयटी आणि मार्केटिंग क्षेत्रातील लोकांना आजचा दिवस संघर्षमय राहील. लेखन आणि कला क्षेत्रात तुमची गोडी निर्माण होईल. आजचा शुभ रंग : निळा.
10. मकर :- ऑफिसमधील महत्त्वाच्या कामात व्यस्त व्हाल. इतरांशी व्यवहार करताना वाद होणार नाही, या गोष्टीची काळजी घ्या. पोटाचे विकार संभावतील. वैचारीकदृष्ट्या गोष्टींमुळे, मनात चिंता सतावत राहील. आजचा शुभ रंग : पांढरा.
11. कुंभ :- विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती झाल्यामुळे, त्यांचा आत्मविश्वास वाढेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून उत्तम सहकार्य आणि प्रतिसाद मिळेल. दाम्पत्यांमध्ये अनुकूल वातावरण राहील. आरोग्य निरोगी राहील. आजचा शुभ रंग : नारंगी.
12. मीन :- व्यापार आणि नोकरीत कोणत्याही प्रकारची त्रुटी येऊ नये, यासाठी नेहमी सतर्क रहा. भगवान श्री हनुमान देवाची पूजा करा. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. वस्तू आणि कपडयांची खरेदी करताना, अधिक खर्च होईल. आजचा शुभ रंग : पिवळा.

Post Bottom Ad

#

Pages