😱विधवा आणि इच्छुक महिलांना लग्नाचे आमिष दाखवत 15 महिलांशी लग्न करून फसवणूक करणाऱ्या भामट्याला पोलिसांनी केली अटक - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, December 8, 2019

😱विधवा आणि इच्छुक महिलांना लग्नाचे आमिष दाखवत 15 महिलांशी लग्न करून फसवणूक करणाऱ्या भामट्याला पोलिसांनी केली अटक💁‍♂पंधरा महिलांशी लग्न करून फसवणूक करणाऱ्या भामट्याला पोलिसांनी अटक केली आहे. विवाह विषयक संकेतस्थावरून घटस्फोटीत महिला, विधवा आणि इच्छुक महिलांना लग्नाचे आमिष दाखवत पैसे उकळून फसवणूक करत होता. या भामट्याला पीडित महिलांच्या मदतीने पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. संपत दरवडे असे महिलांना फसवणाऱ्या भामट्याचे नाव आहे.

👉संपत याची 2015 मध्ये पुण्यात काम करणाऱ्या एका घटस्फोटित महिलेशी ओळख झाली. त्यांच्यामध्ये जवळीक वाढल्यानंतर लग्न केल्यास आर्थिक मदत देण्याचे सांगून महिलकडून 50 हजार रुपये उकळले. अशाच पद्धतीने पैसे उकळण्याची युक्ती त्याला सापडली आणि त्याने महिलांची फसवणूक करण्याचा उद्योग सुरु केला.

🚨पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
संपत हा मुळचा नगर जिल्ह्यातील तळवाडे गावातीचा रहिवाशी असून सध्या तो पुण्यातील हडपसर परिसरात रहात होता. महिलांना लग्नाचे आमिष दाखवू तो त्यांची फसवणूक करायचा. घटस्फोटीत महिलांचा शोध घेण्यासाठी त्याने संकेतस्थळावर आपले आकाऊंट उघडले होते. नाशिकमध्ये अशाच एका महिलेला भेटण्यासाठी तो आला होता. त्याचवेळी पोलिसांनी पीडित महिलांच्या मदतीने सापळा रचून त्याला अटक केली. सध्या त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.

📢पोलिसांनी महिलांची फसवणूक करणाऱ्या संपत दरवडे याच्या मुसक्या आवळल्या असल्या तरी महिलांनी विवाह विषय माहिती भरताना आणि त्यावर संवाद करताना काळजी घेण्याची गरज आहे, असे आवाहन केले.

Post Bottom Ad

#

Pages