🔯 राशी भविष्य :- सोमवार, दिनांक - 16 डिसेंबर 2019 - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, December 15, 2019

🔯 राशी भविष्य :- सोमवार, दिनांक - 16 डिसेंबर 2019

🔯 राशी भविष्य :- सोमवार, दिनांक - 16 डिसेंबर 2019
🔯 राशी फल
1. मेष :- घरातील सदस्यांमध्ये प्रश्न निर्माण होतील. नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. भाऊ-बहिणींकडून संपूर्ण सहकार्य मिळेल. प्रतिस्पर्धींवर विजय मिळवू शकता. कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे. आहारावर नियंत्रण ठेवा. त्यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. अनपेक्षित खर्च होईल. 
2. वृषभ :-  काम-धंद्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. धनलाभ होईल. कुटुंबातील व्यक्तींमध्ये अनुकूल वातावरण राहील. आरोग्य निरोगी राहील. सहकाऱ्यांकडून चांगलं सहकार्य मिळेल. 
3. मिथुन :-  दाम्पत्यांमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. मन स्थिर ठेवा. इतरांशी व्यवहार करतांना सावधगिरी बाळगा. जीवनात अपयश येणार नाही, या गोष्टीवर लक्ष द्या. मित्र-मैत्रीणींच्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल. 
4. कर्क :- प्रलंबित कामं पूर्ण होतील. कार्यात यश मिळेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. मन शांत राहील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. 
5. सिंह :- आजचा दिवस शुभ आहे. आरोग्य निरोगी राहील. धनलाभ होईल. मित्र-मैत्रीणींच्या भेटीमुळे मन प्रसन्न राहील. पर्यटनस्थळी भेट देण्यास जाऊ शकता. नकारात्मक विचार दूर ठेवल्यामुळे, तुमचा आत्मविश्वास वाढेल. 
6. कन्या :- मनात शांतता ठेवा. कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे. पैशांच्या बाबतीत विशेष लक्ष ठेवणं गरजेचे आहे. धनलाभ होईल. आरोग्याची काळजी घ्या. नकारात्मक विचार मनातून दूर केल्यामुळे, संपूर्ण दिवस आनंदात जाईल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष केंद्रीत होणार नाही. 
7. तूळ :- कोर्ट-कचेरीच्या कामापासून दूर रहा. बाहेर फिरायला जाऊ शकता. इतरांशी बोलतांना मनावर संयम ठेवा. इतरांशी व्यवहार करतांना सावधगिरी बाळगा. 
8. वृश्चिक :-  मित्र-मैत्रीणींच्या भेटीमुळे आजचा दिवस आनंदात जाईल. वायफळ खर्च करणं टाळा. पर्यटनस्थळी भेट देण्यास जाऊ शकता. दाम्पत्यांमध्ये अनुकूल वातावरण राहील. नवनवीन कल्पना सुचवालं. 
9. धनु :- आरोग्याची काळजी घ्या. घरात सुख-शांतीचे वातावरण असेल. मन प्रसन्न राहील. व्यवसायात मोठे यश प्राप्त होईल आणि आर्थिक लाभ होईल. नोकरीत पदोन्नती होईल. वरिष्ठांकडून उत्तम सहकार्य मिळेल. भगवान श्री गणेशाची पूजा-अर्चना करा. प्रतिस्पर्धींवर विजय मिळवू शकता. 
10. मकर :- आरोग्याची काळजी घ्या.व्यावसायिक क्षेत्रांतील नवनवीन विचार मनात निर्माण होतील. प्रतिस्पर्धींशी स्पर्धा करू नका. काम-धंद्यात यश आणि आर्थिक लाभ होईल. नोकरीत पदोन्नती होईल. कुटुंबात अनुकूल वातावरण राहील. गृहस्थजीवनात सुख-शांती राहील. 
11. कुंभ :-  नकारात्मक विचार मनातून दूर करा. आहारावर विशेष लक्ष द्या. प्रवास करताना सावधगिरी बाळगा. वायफळ खर्च होण्याची शक्यता आहे. साहित्य आणि आध्यात्मिक गोष्टींमध्ये गोडी निर्माण होईल. 
12. मीन :-  उत्तम आहाराचे सेवन केल्यामुळे, आरोग्य निरोगी राहील. धनलाभ होईल. पैशांचे व्यवहार करतांना सावधगिरी बाळगा. नोकरी आणि कामा-धंद्यात अनुकूल वातावरण राहील. मनावर संयम ठेवा. कोणत्याही नवीन कामाची सुरूवात आज करू नका. 

Post Bottom Ad

#

Pages