🔯 राशी भविष्य :- मंगळवार, दिनांक - 17 डिसेंबर 2019. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Tuesday, December 17, 2019

🔯 राशी भविष्य :- मंगळवार, दिनांक - 17 डिसेंबर 2019.


🔯 राशी भविष्य :- मंगळवार, दिनांक - 17 डिसेंबर 2019.
🔯 राशी फल
1. मेष :- अनेक दिवसांपासून थांबलेली कामे पूर्ण होतील. त्यामुळे मन प्रसन्न होईल. वैवाहिक जीवन आनंदमय राहील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. आजचा शुभ रंग : पांढरा.
2. वृषभ :-  सिने जगताशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस शुभ आहे. पैशांचे आगमन होईल. विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी ठरतील. दाम्पत्य जीवन आनंददायी राहील. आरोग्य चांगले राहील. आजचा शुभ रंग : पांढरा.
3. मिथुन :- खर्च वाढेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस शुभ आहे. एखादे थांबलेले सरकारी काम पूर्ण होईल. प्रेमाने भरलेले वैवाहिक जीवन तुम्हाला प्रसन्न करेल. आजचा शुभ रंग : हिरवा.
4. कर्क :-  आज एखाद्या जुन्या मित्राची मदत होईल. विद्यार्थ्यांना मिळालेल्या यशाने ते खुश होतील. राजकारणाशी संबंधित व्यक्तींना लाभ होतील. आजचा शुभ रंग : निळा.
5. सिंह :-  मुलांकडून एखादी शुभवार्ता मिळेल. व्यवसायात मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. लव्ह लाईफमध्ये तुम्ही आज पार्टनरला वेळ द्याल. दाम्पत्य जीवनात आनंदीआनंद असेल. आरोग्याकडे दुर्लक्ष नको. आजचा शुभ रंग : पिवळा.
6. कन्या :-  धन आगमन होत राहील. प्रवासाचे बेत आखाल. नोकरीच्या ठिकाणी तुमची प्रगती होईल. वैवाहिक जीवनात सुख मिळेल. आयटी तसेच मीडिया क्षेत्रातील व्यक्ती यशस्वी ठरतील. आजचा शुभ रंग : लाल.
7. तूळ :-  व्यवसायात मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. घरात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवन चांगले असेल. आजचा शुभ रंग : पांढरा.
8. वृश्चिक :-  जमीन आणि मालमत्तेची कागदपत्रांचे व्यहार करताना काळजी घ्या. आरोग्याची काळजी घ्या. सरकार कामात यश मिळेल. शक्यतो प्रवास टाळा. आजचा शुभ रंग : नारंगी.
9. धनु :-  बोलण्यावर संयम ठेवा. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. व्यवसाय क्षेत्रात तुम्हाला स्पर्धेकांसमोर उभे रहावे लागेल. आरोग्याची काळजी घ्या. आजचा शुभ रंग : लाल.
10. मकर :-  या राशीच्या विद्यार्थ्यांना मिळत असलेल्या यशामुळे ते आनंदी राहतील. व्यवसायात नफा झाल्याने मन प्रसन्न होईल. आज पैसे मिळण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग : हिरवा.
11. कुंभ :-  सामाजिक कार्यात भाग घेऊ शकता. वडील आणि मित्रांचे सहकार्य मिळेल. नवीन मित्र भेटतील. नोकरी आणि व्यवसायातील लोकांना मिळकत वाढीचा योग आहे. घरात मंगलकार्य ठरू शकते. आजचा शुभ रंग : पिवळा.
12. मीन :-  एखाद्या कामात घाई तुमच्यासाठी डोकेदुखी ठरू शकते. आज लाभ मिळणे थोडे कठीण आहे. व्यापारी करार तसेच व्यवसायात सतर्क राहा. खर्चावर नियंत्रण ठेवा. आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग : निळा.

Post Bottom Ad

#

Pages