😱स्वारगेट येथील मीरा सोसायटीत चोरट्यांनी 2 लाख ५३ हजार रुपयाची रोख रक्कम व ऐवज केला लंपास - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Tuesday, December 10, 2019

😱स्वारगेट येथील मीरा सोसायटीत चोरट्यांनी 2 लाख ५३ हजार रुपयाची रोख रक्कम व ऐवज केला लंपास


💁‍♂स्वारगेट परिसरात मीरा सोसायटीतील वृंदावन इमारती मधील फ्लॅटचे अज्ञात चोरट्यांनी कडी-कोयंडा तोडून 2 लाख ५३ हजार रुपयाची रोख रक्कम व ऐवज चोरी केला आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी स्वारगेट पोलिस दाखल झाले.

👉अज्ञात चोरट्याविरुद्ध
रेश्मा महेशकुमार जरीवाला (वय ६२, रा. मीरा सोसायटी,पुणे) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

🚨 स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी यांनी दिलेल्या माहितीनुसार,
रविवार, दिनांक ८ डिसेंबर ते मंगळवार,  दिनांक १० डिसेंबर या कालावधीत सकाळी ८:०० वाजण्याच्या सुमारास मीरा सोसायटीतील वृंदावन इमारतीचा राहता फ्लॅट बंद असल्याने चोरट्यांनी कशाच्या तरी सहाय्याने कडी-कोयंडा तोडून दरवाजा उचकटून घरामध्ये प्रवेश करत कपाटातील रोख रक्कम, चांदीची वाटी, चांदीचे ताट, चांदीचा ग्लास, इम्पोर्टेड घड्याळ असे एकूण २ लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केला आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात भादवि कलम ३८०,४५४,४५७ नुसार  गुन्हा दाखल केला आहे.
सदर घटनेचा पुढील तपास स्वारगेट पोलिस करत आहेत.

Post Bottom Ad

#

Pages