😱आई आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना; 20 वर्षीय मुलाकडून आईवर तीन महिने वारंवार बलात्कार - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Thursday, December 12, 2019

😱आई आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना; 20 वर्षीय मुलाकडून आईवर तीन महिने वारंवार बलात्कार

😱आई आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना; 20 वर्षीय मुलाकडून आईवर तीन महिने वारंवार बलात्कार
देशात घडत असलेल्या बलात्काराच्या (Rape) घटना पाहता, स्त्रिया सुरक्षित नाहीत याबाबत तळागाळातून निषेध नोंदविला जात आहे. हैद्राबादमधील बलात्काराच्या घटनेमुळे उसळलेली संतापाची लाट शांत होत आहे तोपर्यंत, औरंगाबाद येथील एक धक्कादायक प्रकरण समोर येत आहे. आई आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी ही घटना आहे. गेल्या तीन महिन्यांत अनेकदा आपल्या आईवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली, एका 20 वर्षीय व्यक्तीला बुधवारी अटक करण्यात आली. पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे. बुधवारी पहाटे या महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर सिडको पोलिसांनी या मुलाला अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
आरोपीच्या वडिलांचे सुमारे सात वर्षांपूर्वी निधन झाले आहे. त्यानंतर कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी पीडिता रुग्णालयात नोकरी करत आहे. आरोपी हा पक्का दारुडा असून, त्याला दोन बहिणी आणि एक भाऊ आहे. दारू पिण्यासाठी तो त्याच्या आईकडे नेहमी पैशाची मागणी करीत असे. तिने पैसे देण्यास नकार दिल्यास तो तिला मारहाणही करत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, गेल्या तीन महिन्यांत या मुलाने आपल्या आईवर अनेकदा लैंगिक अत्याचार केले आहेत. याबाबत कुणालाही काही सांगितले तर या महिलेला ठार मारण्याची धमकीही त्याने दिली. सतत होणाऱ्या लैंगिक छळाला कंटाळून महिलेने बुधवारी पहाटे सिडको पोलिस स्टेशन गाठले आणि फिर्याद दिली. या मुलाच्या अटकेनंतर आरोपीला स्थानिक न्यायालयात हजर केले केले गेले. तिथे त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Post Bottom Ad

#

Pages