📣 सोनियाचा पोपट काय म्हणतो..25 हजाराला नाही म्हणतो; भाजप आमदारांची विधानभवनाबाहेर घोषणाबाजी - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Wednesday, December 18, 2019

📣 सोनियाचा पोपट काय म्हणतो..25 हजाराला नाही म्हणतो; भाजप आमदारांची विधानभवनाबाहेर घोषणाबाजी

📣 सोनियाचा पोपट काय म्हणतो..25 हजाराला नाही म्हणतो; भाजप आमदारांची विधानभवनाबाहेर घोषणाबाजी
नागपुरातील हिवाळी अधिवेशनाचा आजचा म्हणजेच तिसरा दिवस शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन चांगलाच गाजण्याची शक्यता आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी आक्रमक झालेल्या भाजप आमदारांनी विधानभवनाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. "सोनियाचा पोपट काय म्हणतो" असा नारा भाजप आमदार आशिष शेलार यांनी दिला, त्यानंतर "25 हजाराला नाही म्हणतो" असं म्हणत भाजप आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
शेतकरी कर्जमाफीची घोषणा होईपर्यंत भाजप आमदारांनी विधीमंडळाचं कामकाज रोखून धरण्याचा पवित्रा घेतला आहे. हेक्टरी 25 हजारांची मदत झालीच पाहिजे, दिलेला शब्द पूर्ण करा, अशा मागण्या भाजप आमदारांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर केल्या. ‘सोनियाचा पोपट काय म्हणतो’ अशी हाक आशिष शेलार यांनी दिल्यानंतर ’25 हजाराला नाही म्हणतो’ अशा शब्दात भाजप आमदारांनी उत्तर दिलं. ‘सामना’तील बातमीचं पोस्टर धरुन आमदारांनी घोषणाबाजी केली.

Post Bottom Ad

#

Pages