😱 उद्योगपतीने मित्रांसोबत केली पत्नीची देवाणघेवाण...मित्रांकडून करून घेतला 3 वेळा पत्नीवर बलात्कार.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Thursday, December 19, 2019

😱 उद्योगपतीने मित्रांसोबत केली पत्नीची देवाणघेवाण...मित्रांकडून करून घेतला 3 वेळा पत्नीवर बलात्कार..

😱 उद्योगपतीने मित्रांसोबत केली पत्नीची देवाणघेवाण...मित्रांकडून करून घेतला 3 वेळा पत्नीवर बलात्कार..

मुंबईत बलात्काराचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका उद्योगपतीला पत्नीच्या बलात्कारात अटक करण्यात आली आहे. उद्योगपतीने मित्रांकडून 3 वेळा पत्नीवर बलात्कार करून घेतला. सगळ्यात धक्कादायक म्हणजे उद्योगपती आणि त्याचे मित्र हे पत्नीची देवाणघेवाण करायचे. या प्रकरणात पोलिसांना माहिती मिळाली असता आरोपी उद्योगपतीस अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
या संपूर्ण घटनेमुळे परिसरात एखच खळबळ उडाली आहे. 2017मध्ये पहिल्यांदा पीडितेवर पतीच्या मित्राने बलात्कार केला. खूप वेळा विरोध करूनही पतीने ऐकले नाही आणि जीवे मारण्याची धकमी दिल्याचं महिलेने पोलिसांना सांगितलं आहे. 2017 नंतर तीन वेळा आरोपी उद्योगपतीच्या मित्रांना महिलेवर बलात्कार केला असल्याचं तिने सांगितलं आहे. पती त्याच्या मित्रांसोबत पत्नीची देवाणघेवाण करायचा. यातून त्याला व्यवासायात फायदा होत असल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. सासऱ्यांनीदेखील पतीच्या कृत्याला समर्थन दिलं आणि जीवे मारण्याची धकमी दिली. जे सांगितलं ते चुपचाप करायचं अशी धमकी सासऱ्याकडून देण्यात आल्याचं पीडितेने पोलिसांना सांगितलं आहे.

पीडितेने पोलिसांना दिलेल्या माहितीच्या आधारे आरोपी विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलीस आता आरोपीची चौकशी करून बलात्कार करणाऱ्या आरोपी मित्रांनाही ताब्यात घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, सुरक्षेसाठी पीडितेची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार असल्याचंही पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

Post Bottom Ad

#

Pages