🚨हरवलेल्या 3 वर्षाच्या चिमुकल्यास पोलिसांनी सुखरूप केले आई-वडिलांकडे स्वाधीन - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Monday, December 16, 2019

🚨हरवलेल्या 3 वर्षाच्या चिमुकल्यास पोलिसांनी सुखरूप केले आई-वडिलांकडे स्वाधीन

🚨हरवलेल्या 3 वर्षाच्या चिमुकल्यास पोलिसांनी सुखरूप केले आई-वडिलांकडे स्वाधीन

कोंढवा परिसरात वडील भाजी आणण्यासाठी सोमजी चौक याठिकाणी गेले असता त्यांच्या पाठीमागे जात तीन वर्षाचा चिमुकला हरवल्याची घटना कोंढवा परिसरात घडली. कोंढवा पोलिसांनी हरवलेल्या मुलास ताब्यात घेत. अथक परिश्रम करून आई-वडिलांचा शोध घेत तीन वर्षाच्या चिमुकल्यास आई-वडिलांकडे सुखरूप स्वाधीन केले आहे.

कोंढवा पोलीसांनी दिलेल्‍या माहितीनुसार,
पुणे शहर कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खडीमशीन चौकीत रविवार (दि. 15) रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एका सुजाण नागरिकाने पोलीस चौकीला कळवले कि,  एक लहान मुलगा हा येवलेवाडी बस स्टॉप कोंढवा येथे रडत फिरताना मिळून आला असून त्याच नाव, पत्ता विचारले असता सांगता येत नाही. त्यामुळे लागलीच खडीमशीन चौकीतील मार्शल पोलीस नाईक राऊत यांनी त्या ठिकाणी जाऊन रडत असलेल्या लहान मुलास ताब्यात घेत पोलीस चौकीत आणत लहान मुलांचा विश्वास संपादन करत सदर मुलाच्या आई-वडिलांच्या व नातेवाईकांचा शोध घेणे कामी कोंढवा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दादा पवार, पोलिस स्टेशन इन्चार्ज पोलीस उपनिरीक्षक अबुजर चाऊस, पोलीस शिपाई बांदल, खडीमशीन चौकीचे अंमलदार सहाय्यक पोलीस फौजदार पी.एस.कामथे, पोलीस नाईक धोत्रे, खडीमशीन चौकीचे मार्शल पोलीस नाईक राऊत यांनी मुलाच्या आई-वडिलांचा शोध घेत असतांना विश्वसनीय सूत्रांकडून  लहान मुलाचे वडील उपेन्‍द्रराम (रा.सोमजी गाव,कोंढवा,पुणे) यांची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर लहान मुलाच्या आई-वडिलांना खडीमशीन चौकी येथे बोलावून त्यांची खात्रीलायक ओळख पटवून तीन वर्षाचा चीमुकल्यास आई-वडिलांच्या ताब्यात सुखरूप दिले.

लहान मुलाच्या वडिलांनी सांगितले की,
रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मी सोमजी चौक,कोंढवा,पुणे या ठिकाणी भाजी आणण्यासाठी जात असतांना माझ्या पाठीमागे लहान मुलगा रणजीत येत आहे याची मला कल्पना नव्हती. भाजी घेऊन घरी आलो असता मुलगा घरात नसल्याने आम्ही सर्वनातेवाइकांनी मिळून लहान मुलाचा शोध आजूबाजूला व परिसरात घेतला असता. लहान मुलगा रणजीत मिळून आला नाही. तेवढ्यात कोंढवा पोलिस हे देवदूता सारखे आमच्या समोर येऊन मुलाला आमच्याकडे स्वाधीन केले आहे.
हरवलेला मुलगा सुखरूप मिळून आल्याने त्याच्या आई-वडिलांनी व नातेवाइकांनी कोंढवा पोलिसांचे खूप खूप आभार मानत कोंढवा पोलिसांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

सदरची कामगिरी,
कोंढवा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दादा पवार, पोलिस स्टेशन इन्चार्ज पोलीस उपनिरीक्षक अबुजर चाऊस, पोलीस शिपाई बांदल, खडीमशीन चौकीचे अंमलदार सहाय्यक पोलीस फौजदार पी.एस.कामथे, पोलीस नाईक धोत्रे, खडीमशीन चौकीचे मार्शल पोलीस नाईक राऊत यांनी केली आहे.

Post Bottom Ad

#

Pages