🚨जबरदस्ती मोबाईल चोरणाऱ्या 3 चोरट्यांना कोंढवा पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करून केले जेरबंद - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Monday, December 16, 2019

🚨जबरदस्ती मोबाईल चोरणाऱ्या 3 चोरट्यांना कोंढवा पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करून केले जेरबंद

🚨जबरदस्ती मोबाईल चोरणाऱ्या 3 चोरट्यांना कोंढवा पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करून केले जेरबंद

कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत पवन मुन्ना यादव पेंटिंगच्या व्यवसाय करणारे हे एन.आय.बी.एम, उंड्री रोडवरील बस स्टॉपवर काम संपवून घराकडे जात असताना. अज्ञात चोरट्यांनी जबरदस्तीने मोबाईल हिसकावून घेत पळून जाताना गस्तीवर असलेले कोंढवा मार्शल पोलीस नाईक मोगल, जडे पोलीस हवालदार नाईक यांनी फिल्मी स्टाईलने चोरट्यांचा पाठलाग करून तीन चोरट्यांना जेरबंद केले आहे. या घटनेप्रकरणी पवन मुन्ना यादव यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

जबरदस्तीने मोबाईल चोरणारे आरोपी
1) अनुराग बाळासाहेब दनाणे
2) उमेश ज्ञानेश्वर गोंडे
3) प्रशांत हरिभाऊ वाकुडे (सर्व राहणार इस्कॉन मंदिराशेजारी,कोंढवा बुद्रुक,पुणे) यांच्यावर 392, 34 नुसार गुरन 964/19 गुन्हा दाखल करत अटक केली आहे.

कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार,
पुणे शहर कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत (दि.13) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पवन मुन्ना यादव (वय 18, रा.विमाननगर एअरपोर्ट बाजूला) हे एन.आय.बी.एम, उंड्री रोडवरील बस स्टॉपवर काम संपवून घराकडे जात असताना. एका दुचाकीवरून तीन अज्ञात इसम त्यांच्याकडे आले व त्यांनी पवन यांच्या हाता मधील मोबाईल जबरदस्ती हिसकावून घेतला.अज्ञात इसमांनी तोंडाला मास्क लावले होते. लागलीच ते त्या परिसरांमधून दुचाकीवरून पसार झाले. घडलेल्या घटनेमुळे पवन यांना काही समजण्याचा पूर्वीच अज्ञात इसमांनी त्यांच्याकडून मोबाईल जबरदस्ती हिसकावून नेला होता. त्यामुळे ते घाबरले होते त्यांना काही सांगता येत नव्हते परंतु त्या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार वीर अशोक सुतार (वय 25, रा.पर्वती पायथा,जनता वसाहत,पुणे) यांनी त्या परिसरात गस्तीवर असणारे कोंढवा पोलीस ठाण्याकडील पोलीस नाईक मोगल व पोलीस शिपाई जडे यांना घडलेली घटना सांगितली. त्यानुसार त्यांच्या कडून माहिती प्राप्त करून ते अज्ञात इसम कोणत्या दिशेने गेले याबाबत विचारणा करून ते त्या दिशेने रवाना झाले. त्यावेळी पोलीस हवालदार नाईक हे इनामदार हॉस्पिटल खबरीची पूर्तता करून एन.आय.बी.एम रोड चौकाकडे येत असताना त्यांना वाटेत कोंढवा मार्शल वेगाने जाताना दिसले काही अंतरावर गेल्यावर कोंढवा पोलीस मार्शल यांच्या मदतीला पोलीस हवलदार नाईक हे देखील गेले. तेवढ्यात त्यांना संशयित इसम दुचाकीवरून ट्रिपल सीट जाताना दिसले लागलीच त्यांनी त्यांची दुचाकी संशयित इसमांच्या दुचाकी समोर आडवी घातल संशयित इसमांना अडवून ताब्यात घेत कोंढवा पोलीस चौकी येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक मधाळे यांच्या समक्ष आणले व संशयित इसमांची सखोल चौकशी केली असता. आरोपी अनुराग बाळासाहेब दनाणे, उमेश ज्ञानेश्वर गोंडे, प्रशांत हरिभाऊ वाकुडे (सर्व राहणार इस्कॉन मंदिराशेजारी,कोंढवा बुद्रुक,पुणे) यांनी मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतल्याच्या गुन्ह्याची कबुली दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक मधाळे यांनी कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांना घडलेल्या प्रकाराची माहिती कळवत त्यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार 392, 34 नुसार गुरन 964/19 गुन्हा दाखल केला आहे.

सदर गुन्ह्यात कोंढवा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गुन्हे प्रगटीकरण शाखा चेतन मोरे हे गुन्ह्यातील आरोपींनी अशा प्रकारचे किती गुन्हे केले आहेत का ? याबाबत पुढील तपास करत आहेत.

सदरची कामगिरी,
मा.अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर सुनील फुलारी, मा.पोलीस आयुक्त परिमंडळ 5 पुणे शहर सुहास बावचे, सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग सुनील कलगुटकर, कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक मधाळे, पोलीस हवालदार नाईक, पोलीस नाईक मोगल, जडे यांनी केली आहे.

Post Bottom Ad

#

Pages