🚨400 गावठी बॉंम्बसह संशयिताला पोलिसांनी शिताफीने केली अटक - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, December 15, 2019

🚨400 गावठी बॉंम्बसह संशयिताला पोलिसांनी शिताफीने केली अटक

🚨400 गावठी बॉंम्बसह संशयिताला पोलिसांनी शिताफीने केली अटक

पाटण तालुक्यातील तारळे परिसरात डुकरे मारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या 400 गावठी बॉंम्बसह संशयितरित्या फिरणाऱ्या अमर लुंगा आदिवासी मक्कड (वय 40 रा. कोड, ता. जि. कटनी, मध्यप्रदेश) या परप्रांतीयास उंब्रज पोलिसांनी तारळे भागातील कोंजवडे याठिकाणी शिताफीने पकडले.

उंब्रज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
पोलिसांना शुक्रवारी दि. 13 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन उंब्रज पोलिस, तारळे पोलीस, बॉम्बशोधक व नाशक पथकाने घटनास्थळी जाऊन टेहळणी करण्यास सुरुवात केली. त्यादरम्यान तारळे ते कोंजवडे जाणाऱ्या रस्त्यावर एक परप्रांतीय व्यक्ती संशयास्पद फिरत असल्याचे दिसून आले. पोलिसांचा संशय बळावल्याने त्याची चौकशी केली असता त्याच्या पिशवीत सापडलेले 400 गावठी बॉंम्ब, सात अँन्ड्रॉईड मोबाईल व 20 हजार 500 रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली. याबाबत पोलिसांनी संशयिताची विचारणा केली असता जंगली डुकरे मारण्यासाठी याचा वापर करत असल्याचे त्याने सांगितले. उंब्रज पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी दि. 12 डिसेंबर रोजी सायंकाळी बनावट सोने देऊन ग्राहकाची फसवणुकीच्या घडलेल्या गुन्ह्यात संशयिताचा सहभाग असल्याचे निष्पन्न होत असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.

Post Bottom Ad

#

Pages