गुंतवणुकीचे आमिष दाखवत एका महिलेची 45 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Saturday, December 14, 2019

गुंतवणुकीचे आमिष दाखवत एका महिलेची 45 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

गुंतवणुकीचे आमिष दाखवत एका महिलेची 45 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

सोशल मीडियाद्वारे झालेल्या ओळखीचा फायदा घेत महिलेला गुंतवणूक सल्लागार असल्याची बतावणी करत आभासी चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने मार्केटयार्ड भागातील एका महिलेची 45 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

महिलेची 45 लाख रुपयांची फसवणूक करणारे आरोपी दीपक चौधरी (रा. दिल्ली), भवानीप्रसाद सेंगू (रा. आकुर्डी) यांच्या विरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनुस शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार,
तक्रारदार महिलेची आरोपीं बरोबर दोन वर्षांपूर्वी सोशल मीडियाद्वारे ओळख झाली होती. त्यावेळी चौधरीने महिलेकडे गुंतवणूक सल्लागार असल्याची बतावणी केली. आभासी चलनात गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळेल, असे आमिष तिला दाखवण्यात आले होते. त्यानंतर महिलेला बॅंक खात्यात वेळोवेळी पैसे भरण्यास सांगितले. महिलेने वेळोवळी वेगवेगळ्या बॅंकेत पैसे भरले. आभासी चलनाबाबतचा संकेतस्थळावर महिलेने माहिती घेतली. आभासी चलनात गुंतवण्यात आलेली रकमेपोटी मिळणारा परताव्यासाठी तिने चौधरीकडे विचारणा केली. तेव्हा चौधरी आणि त्याचा साथीदार सेंगू यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर तिने सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार दिली. या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनुस शेख सदर घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Post Bottom Ad

#

Pages