🏗धायरीत 5 मजली निर्मानाधिन अनधिकृत इमारतीवर नागरिकांच्या विरोधानंतरही महापालिकेने केली जमीनदोस्त - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Wednesday, December 18, 2019

🏗धायरीत 5 मजली निर्मानाधिन अनधिकृत इमारतीवर नागरिकांच्या विरोधानंतरही महापालिकेने केली जमीनदोस्त

🏗धायरीत 5 मजली निर्मानाधिन अनधिकृत इमारतीवर नागरिकांच्या विरोधानंतरही महापालिकेने केली जमीनदोस्त

पुणेमहापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट धायरीमधील औद्योगिक वसाहतीच्या जागेत उभारण्यात आलेल्या 5 मजली निर्मानाधिन अनधिकृत इमारतीवर पालिकेच्या बांधकाम विभागाकडून मंगळवारी कारवाई करण्यात आली. या कारवाईस स्थानिकांनी विरोध केला; तर काही नागरिक इमारतीच्या टेरेसवरही जाऊन उभे राहिले. त्यामुळे सुमारे 3 ते 4 तास या भागात तणावाचे वातावरण होते.

पुणे महापालिका बांधकाम विभाग कार्यकारी अभियंते नामदेव गंभीरे यांनी दिलेल्या माहितीनुसार,
धायरी स. नं. 30 पारी कंपनीजवळ औद्योगिक वसाहतीचे आरक्षण असलेल्या भागात ही निवासी इमारत बांधण्याचे काम सुरू होते. पार्किंगसह सुमारे 5 मजल्यांची ही इमारत आहे. महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या भागात हे बांधकाम सुरू होते. पालिकेकडून अशा उंच बांधकामांवर कारवाई करण्यासाठी अत्याधुनिक तसेच सुमारे 60 ते 75 मीटर उंचीपर्यंत कारवाई करू शकणारे जॉ कटर मागवले आहेत. त्याद्वारे 11 मधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू केली आहे. मुंढवा येथील कारवाईनंतर मंगळवारी धायरी येथे ही कारवाई हाती घेतली. मात्र, बांधकाम विभागाचे पथक कारवाईसाठी पोहोचताच स्थानिक नागरिकांसह बांधकाम मजूर तसेच संबंधितांकडून कारवाईस विरोध करण्यात आला. तर पालिकेची कारवाई हाणून पाडण्यासाठी काही नागरिक थेट इमारतीच्या टेरेसवर गेले. त्यामुळे सुमारे 3 ते 4 तास कारवाई थांबविण्यात आली होती. अखेर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांनी पोलिसी भाषा तसेच अडथळा करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याची ताकीद दिल्यानंतर नागरिकांनी माघार घेतली. त्यानंतर पालिकेकडून या इमारतीवर कारवाई करण्यात आली आहे.

सदरची कारवाई,
पुणे महापालिका बांधकाम विभाग कार्यकारी अभियंते नामदेव गंभीरे, उप अभियंता राहूल सांळूखे, कनिष्ठ अभियंता हेमंत कोळेकर यांच्यासह बांधकाम विभाग तसेच अतिक्रमण विभागाच्या पथकाने केली आहे.

Post Bottom Ad

#

Pages