🚨7 वर्षांच्या चिमुकलीचे पाळणाघरात लैंगिक शोषण करणाऱ्या 35 वर्षीय आरोपीला चतुःश्रुंगी पोलिसांनी केली अटक - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Saturday, December 14, 2019

🚨7 वर्षांच्या चिमुकलीचे पाळणाघरात लैंगिक शोषण करणाऱ्या 35 वर्षीय आरोपीला चतुःश्रुंगी पोलिसांनी केली अटक

🚨7 वर्षांच्या चिमुकलीचे पाळणाघरात लैंगिक शोषण करणाऱ्या 35 वर्षीय आरोपीला चतुःश्रुंगी पोलिसांनी केली अटक

बलात्काराच्या (Rape Case)  घटनांनी देश हादरला असला तरी अजूनही या कुप्रवृत्तीला रोख बसलेला नाही. याचे एक नवे उदाहरण आता पुण्यातून समोर येत आहे. चतुःश्रुंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका पाळणाघरात 7 वर्षांच्या मुलीवर तिच्याहून तब्बल पाच पट वयाच्या पुरुषाने लैंगिक अत्याचार (Sexual Harassement) केल्याचे समजत आहे.शुक्रवारी, 13 डिसेंबर रोजी या पीडित मुलीच्या आईने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीने या घटनेचा खुलासा झाला. या प्रकरणी चतुःश्रुंगी पोलिसांकडून संबंधित आरोपीवर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला कालच अटक करण्यात आली आहे.

चतुःश्रुंगी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
तक्रारदार या नोकरी करत असल्यामुळे त्या त्यांच्या सात वर्षांच्या मुलीला पाळणाघरात ठेवतात. जानेवारीपासून त्या मुलीला पाळणाघरात ठेवत होत्या. आरोपी हा पाळणाघरातील आजी बाहेर गेल्यानंतर अल्पवयीन मुलीला जवळ घेऊन तिच्याशी अश्लील चाळे करत होता. तसेच, हा प्रकार कोणाला सांगू नये म्हणून मुलीला भीती दाखवत असे. यामुळे घाबरून गेलेली मुलगी पाळणाघरात जाण्यापासून सतत नकार देत होती, अखेरीस आईने नीट चौकशी केली असता, मुलीने हा प्रकार सांगितला. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याला चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे.

दरम्यान, याआधी सुद्धा अनेक छोट्या मोठ्या शहरातून लहान मुलांवरील अत्याचाराच्या खबरी सतत समोर आल्या आहेत. बालमनावर परिणाम करणाऱ्या या भीषण घटनांमुळे पालकांच्या मनात देखील धास्ती बसली आहे. त्यामुळे अशा आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी देखील वारंवार केली जातीये.

Post Bottom Ad

#

Pages