🚨लॉकेटो ऑनलाईन डेटिंग सर्व्हिस व स्पीड डेटिंगच्या नावाखाली 73 लाखांची फसवणूकरणार्या 3 आरोपीनां पोलिसांनी केली अटक... - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Friday, December 13, 2019

🚨लॉकेटो ऑनलाईन डेटिंग सर्व्हिस व स्पीड डेटिंगच्या नावाखाली 73 लाखांची फसवणूकरणार्या 3 आरोपीनां पोलिसांनी केली अटक...

🚨लॉकेटो ऑनलाईन डेटिंग सर्व्हिस व स्पीड डेटिंगच्या नावाखाली 73 लाखांची फसवणूकरणार्या 3 आरोपीनां पोलिसांनी केली अटक...

लॉकेटो ऑनलाईन डेटिंग सर्व्हिस व स्पीड डेटिंगच्या (Loketo Online Dating Service and Speed Dating) कंपनीच्या मार्फत डेंटिंगसाठी हव्या असलेल्या मुली त्या संबधित पत्यावर पुरविण्यात येणार असे सांगितले गेले. यासाठी फिर्यादीकडून रजिस्ट्रेशन फी, आयडी फी, अॅग्रीमेंट आदीसाठी रक्कम भरण्यास सांगितले. परंतु, आपली फसवणूक झाल्याचे कळताच फिर्यादीने पुढील प्रक्रियेसाठी नकार दिला. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीला धमकावून 73 लाखांची फसवणूक केल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. फिर्यादीने खारघर (Kharghar) येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

पोलिसांनी आरोपींना केले अटक :-
खारघर पोलिसांनी तक्रारीची दखल घेत आरोपीनां कोलकाता (Kolkata) येथून रवी दास, प्रबीर सहा आणि अर्णब सिंग उर्फ निल रॉय असे 3 आरोपींना अटक केली आहे.

खारघर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
फिर्यादीला गेल्या काहीदिवसांपूर्वी लॉकटो ऑनलाईन डेटिंग सर्व्हिस व स्पीड डेटिंग या बनावट कंपनीतून फोन आला होता. तसेच त्यांच्या कंपनीमार्फत डेटिंगसाठी हव्या असलेल्या मुली संबधित पत्यावर मिळतील अशी माहिती फोनवरून फिर्यादीला देण्यात आली. याकरिता फिर्यादीकडून संबधित फी चे निमित्त सांगून काही पैशांची लूट केल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. त्यानंतर फिर्यादीने पुढील प्रकियेसाठी पैसे देण्यास साफ नकार दिला. परंतु, फिर्यादीच्या नकारानंतर त्याला विविध मार्गातून धमकविण्यास आरोपीने सुरवात केली. दरम्यान, फिर्यादीला खोट्या नोटीस पाठवणे आणि क्राईम ब्रॅंचच्या नावाखाली खोटे फोन करुन तब्बल 73 लाख 51 हजार 822 रुपयांची लूट केली होती. आपली बदनामी होईल या भितीने फिर्यादीने ही गोष्ट गुपीत ठेवली. परंतु, फिर्यादीने हा प्रकार त्यांच्या नातेवाईकांना सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल सल्ला दिला. त्यानंतर फिर्यादीने खारघर पोलिसात तक्रार दाखल केली. हा सर्वप्रकार पोलिसांनी कळताच आरोपीनां कोलकाता (Kolkata) येथून रवी दास, प्रबीर सहा आणि अर्णब सिंग उर्फ निल रॉय असे 3 आरोपींना अटक करत पोलिसांनी आरोपींचा पर्दाफाश केला.

पोलिसांचे नागरिकांनी अवाहन :-
रवी दास, प्रबीर सहा आणि अर्णब सिंग उर्फ निल रॉय असे या आरोपींची नावे आहे. यात आरोपींनी केवळ फिर्यादकडूनच पैसे उकळले नसून मुंबई, नवी मुंबई, बंगळरु, चेन्नई या शहरातील लोकांची लूट केली असल्याचे उघड झाले आहे. सध्या फसवणुकीच्या प्रकारनांनी वेग घेतला असून नागरिकांनी अशाप्रकारच्या कोणत्याही फोनला बळी पडू नये, असे अवाहन पोलिसांनी केले आहे.
सदर घटनेचा पुढील तपास खारघर पोलिस करत आहेत.

Post Bottom Ad

#

Pages