📣 पोलीस शिपाई चालक,सशस्त्र पोलीस शिपाई भरतीसाठी 8 जानेवारी 2019 पर्यंत अर्ज करा... - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Wednesday, December 11, 2019

📣 पोलीस शिपाई चालक,सशस्त्र पोलीस शिपाई भरतीसाठी 8 जानेवारी 2019 पर्यंत अर्ज करा...

📣 पोलीस शिपाई चालक,सशस्त्र पोलीस शिपाई भरतीसाठी 8 जानेवारी 2019 पर्यंत अर्ज करा...
महाराष्ट्रातील 21 ठिकाणी पोलीस शिपाई चालक तर पुणे, नवी मुंबई,नागपूर SRPF च्या 10 ठिकाणी राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई पदासाठी नोकरभरतीची काही दिवसांपूर्वी घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान सुरूवातीला 22 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन माध्यमातून अर्ज दाखल करण्याची सोय mahapariksha.gov.in वर उपलब्ध होती. मात्र आता यामध्ये मुदतवाढ करण्यात आली आहे. आता इच्छुक उमेदवार 8 जानेवारीपर्यंत ऑनलाईन माध्यमातून अर्ज दाखल करू शकतात. दरम्यान राज्यात जिल्हा पोलीस शिपाई चालक, लोहमार्ग पोलीस शिपाई चालक आणि राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF)या पदांसाठी 1847 जागांसाठी अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता :-
पोलीस शिपाई चालक पदासाठी उमेदवार इयत्ता 12 वी उत्तीर्ण आणि हलके वाहन चालक परवाना (LMV-TR)धारक असणं आवश्यक आहे. सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF) इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

वयाची अट :-
इच्छुक उमेदवार, 31 डिसेंबर 2019 रोजी, पोलीस शिपाई चालक 19 ते 28 वर्षे आणि सशस्त्र पोलीस शिपाई: 18 ते 25 वर्षे पूर्ण असणं आवश्यक आहे.

ऑनलाइन अर्ज :-
पोलीस शिपाई चालक आणि सशस्त्र पोलीस शिपाई भरती इतर महत्त्वाचे तपशील इथे सविस्तर पहा. तर ऑनलाईन अर्ज mahapariksha.gov.in वर करता येणार आहे.

सा कराल अर्ज ?
mahapariksha.gov.in वर लॉग ईन करा. नोटिफिकेशन पाहून अ‍ॅप्लिकेशन लिंकवर क्लिक करा.
त्यावर आवश्यक माहिती, कागदपत्र यांची माहिती भरून ते अपलोड करा.
त्यानंतर ऑनलाईन पेमेंट करून तुमची रजिस्टर नंबर नीट लिहून ठेवा. भविष्यात अ‍ॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी त्याची मदत होईल.

◼ ऑनलाईन माध्यमातून अर्ज दाखल करण्याचं आवाहन :-
पोलिस भरतीसाठी ऑनलाईन माध्यमातून अर्ज दाखल करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मात्र परीक्षेची तारीख आणि इतर अपडेट्स तुम्हांला mahapariksha.gov.in वरच पहायला मिळतील. त्याचा तारखा, वेळापत्रक लवकरच जाहीर केलं जाणार आहे.

Post Bottom Ad

#

Pages