😱 धक्कादायक प्रकार..पुण्यात 9 वाहने जाळली - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, December 22, 2019

😱 धक्कादायक प्रकार..पुण्यात 9 वाहने जाळली

😱 धक्कादायक प्रकार..पुण्यात 9 वाहने जाळली...

पुण्यात वाहने जाळण्याचे सत्र सुरु असून अज्ञात व्यक्तींकडून रविवारी पहाटे 4:00 वाजण्याच्या सुमारास पुणे येथील पौड रोड परीसरातील म्हातोबा नगर भागात रस्त्यालगत पार्किंग केलेल्या दुचाकी वाहनांचे नुकसान करत आग लावून परिसरात दहशत पसरवण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेत चार दुचाकी जळून खाक झाल्या तर पाच दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याप्रकरणी संकेत ज्ञानोबा उभे (वय-26 रा. पुणे) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
कोथरूड पोलिस स्टेशनच्या हद्दीत पौड रोड येथील म्हातोबा नगर भागातील किष्किंदा पोलीस चौकच्या परिसरात आज रविवार  22 डिसेंबर  रोजी पहाटे 4:00 वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी रस्त्यालगत पार्किंग केलेल्या चार दुचाकींची तोडफोड करत आग लावून परिसरात दहशत पसरवण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या घटनेत चार दुचाकी जळून खाक झाल्या तर पाच दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गुन्हेगारांच्या वर्चस्व वादातून वाहने जाळण्याची घटना झाल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. वाहनांची जाळपोळ करणाऱ्या आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी देखील नागरिक करत आहेत.
सदर घटनेचा पुढील तपास कोथरुड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रतिक्षा जोशी करत आहेत.

Post Bottom Ad

#

Pages