🏃🏻३४ व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, December 1, 2019

🏃🏻३४ व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


🏃🏻३४ व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेला रविवारी दिनांक १ डिसेंबर २०१९ रोजी पहाटे ५ वाजता कै. बाबुराव सणस मैदानापासून ढोल ताशाच्या गजरात सुरुवात झाली. देश, विदेशातील खेळाडूंसह शहरातील अनेक भागातील खेळाडू रस्त्यावर धावताना पाहण्यास मिळाले. याचसोबत स्पर्धेत विविध क्षेत्रातील मंडळीनीही हजेरी लावली. ४२ किलोमीटर पुरुष, २१ किलो मीटर पुरुष आणि महिला, १० किलोमीटर पुरुष आणि महिला, पाच किलोमीटर मुले आणि मुली आणि चॅरिटी रन साडेतीन किलोमीटरमध्ये ही स्पर्धा पार पडली.


🏆पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेमध्ये दरवर्षी प्रमाणे यंदा देखील परदेशी खेळाडूचे वर्चस्व पाहण्यास मिळाले. पुरुष गटात इथिओपियाचा सोलोमन हा विजेता ठरला आहे. महापौर मुरलीधर मोहोळ आणि स्पर्धेचे आयोजक माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन विजेत्यांचा विशेष गौरव करण्यात आला.


Post Bottom Ad

#

Pages