🚨पत्नीचा खून करून तिने आत्महत्या केल्याचा बनाव करणाऱ्या पतीला पोलिसांनी केली अटक - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, December 1, 2019

🚨पत्नीचा खून करून तिने आत्महत्या केल्याचा बनाव करणाऱ्या पतीला पोलिसांनी केली अटक



👉दारुच्या नशेत आपल्या पत्नीचा खून करत तिने आत्महत्या केल्याचा बनाव करणाऱ्या पतीला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. अयोध्या कहाळे असं या पीडित महिलेचं नाव असून पतीचं नाव विजय कहाळे असं आहे. नातेवाईक आणि पोलिसांना दिलेल्या परस्परविरोधी माहितीमुळे विजय पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

🚨पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
दारु पिऊन घरी आल्यानंतर, विजय आणि त्याची पत्नी अयोध्या यांच्यात भांडणं झालं. भांडण विकोपाला गेल्यानंतर विजयने आपल्या घरातील एका टणकदार वस्तुने पत्नी अयोध्याच्या कपाळावर मारली. यामुळे अयोध्या बेशुद्ध होऊन खाली पडल्या, यानंतर विजयने दोरीने गळा आवळून पत्नीचा खून केला. या घटनेनंतर विजयने आपल्या नातेवाईकांना खाली पडून गंभीर जखमी झाल्यामुळे पत्नीचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. तर पोलिसांना दिलेल्या जबानीत विजयने आपल्या पत्नीने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. परस्पर विरोधी जबानी दिल्यामुळे पोलिसांनी अखेरीस आपला खाक्या दाखवल्यानंतर विजयने आपला गुन्हा कबूल केला. हिंजवडी पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Post Bottom Ad

#

Pages