🎖देशाच्या संस्कृतीचं दर्शन घडवत भारतीय पारंपरिक वेशभूषेत अभिजीत बॅनर्जी यांनी स्वीकारला नोबेल पुरस्कार - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Wednesday, December 11, 2019

🎖देशाच्या संस्कृतीचं दर्शन घडवत भारतीय पारंपरिक वेशभूषेत अभिजीत बॅनर्जी यांनी स्वीकारला नोबेल पुरस्कार

🎖देशाच्या संस्कृतीचं दर्शन घडवत भारतीय पारंपरिक वेशभूषेत अभिजीत बॅनर्जी यांनी स्वीकारला नोबेल पुरस्कार

देशाच्या संस्कृतीचं जतन आणि संवर्धन करणं ही एक देशाचा नागरिक म्हणून प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. मात्र, ही जबाबदारी देशातील नागरिकांकडून कितपत चोखपणे पार पाडली जाते हा एक चिंतनाचा विषय आहे. मात्र, काही नागरिक खरच फार ग्रेट आहेत, जे देशासाठी, देशाच्या संस्कृतीच्या संवर्धनासाठी संघर्ष करत आहेत. आपल्या देशाचे नाव मोठे व्हावे, अशी त्यांची मनापासून इच्छा असते. त्यामुळे अशी माणसं खऱ्या आयुष्यात शुभ्र मनाची आणि सर्वोत्कृष्ट ठरतात. मंगळवारी स्वीडन देशाची राजधानी स्टॉकहोम येथे नोबेल पुरस्कार प्रदान करण्याचा मोठा सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यात भारतीय वंशाचे अभिजीत बॅनर्जी यांना पुरस्कार प्रधान करण्यात आला. या कार्यक्रमात अभिजीत भारतीय पारंपरिक वेशभूषेत दिसले. त्यामुळे जगभरातून त्यांचे कौतुक केले जात आहे.

Watch Abhijit Banerjee, Esther Duflo and Michael Kremer receive their medals and diplomas at the #NobelPrize award ceremony today. Congratulations!

They were awarded the 2019 Prize in Economic Sciences “for their experimental approach to alleviating global poverty.” pic.twitter.com/c3ltP7EXcF

— The Nobel Prize (@NobelPrize) December 10, 2019

वैश्विक गरिबी निर्मूलनाविषयी केलेल्या प्रयोगशील संशोधनासाठी भारतीय वंशाचे अमेरिकी संशोधक अभिजीत बॅनर्जी यांना यावर्षीचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला होते. मंगळवारी स्वीडन देशाची राजधानी स्टॉकहोमच्या स्टॉकहोम सिटी हॉलमध्ये नोबेल पुरस्कार प्रधान करण्याचा सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमात भारताचे अभिजीत बॅनर्जी यांना नोबेल पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी अभिजीत भारतीय पारंपरिक वेशभूषेत पोहोचले होते. त्यामुळे अनेकांच्या नजरा अभिजीत यांच्याकडे खिळल्या. दरम्यान, स्वीडनचे राजा कार्ल गुस्ताफ यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रधान करण्यात आला. त्यांच्यासोबतच वैश्विक गरिबी निर्मूलनाविषयी केलेल्या प्रयोगशील संशोधनासाठी एस्थेर डफ्लो आणि आणि मायकेल क्रेमर यांना देखील हा पुरस्कार प्रधान करण्यात आला.

अभिजीत बॅनर्जी यांच्याविषयी…
मूळचे भारतीय असलेले अभिजीत बॅनर्जी सध्या अमेरिकेतल्या प्रतिष्ठीत मेसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) मध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत. १९८१ साली कोलकाता विद्यापीठातून बॅनर्जी यांनी बीएससी (BSc) केलं तर १९८३ मध्ये दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अर्थात जेएनयू (JNU) मधून एमए (MA) पूर्ण केले आहे.

अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना पुरस्कार देण्यात आल्यानंतर प्रदीर्घ काळाने भारतीय अर्थशास्त्रज्ञाला नोबेल देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांच्यानंतर रविंद्रनाथ टागोर, सी.व्ही.रामन, मदर तेरेजा, अमर्त्य सेन आणि कैलाश सत्यर्थी या पाचजणानंतर नोबेल पुरस्कार जिंकणारे अभिजित बॅनर्जी हे सहावे भारतीय आहेत. तर अमर्त्य सेन यांच्यानंतर अर्थशास्त्रातले नोबेल मिळवणारे अभिजित बॅनर्जी हे दुसरे भारतीय ठरले आहेत.

Post Bottom Ad

#

Pages