✨महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा रोमहर्षक प्रवास... - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Thursday, December 12, 2019

✨महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा रोमहर्षक प्रवास...


महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा रोमहर्षक प्रवास...

🎉 Sharad Pawar 79th Birthday🎂 Special :-
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा म्हणून आपण ज्यांचा उल्लेख करतो, त्या निर्भीड, हुशार, स्पष्ट वक्ता शरद पवार यांचा आज 79 वा वाढदिवस. राजकारणात स्वत:ला पूर्णपणे झोकून देऊन राजकीय डावपेचात चांगलेच मुरलेले शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची खरी ओळख ठरले किंवा केवळ महाराष्ट्रात नव्हे तर देशात राष्ट्रवादी काँग्रेसला स्वत:चे असे भक्कम स्थान मिळवून दिले. शरद पवार न केवळ राजकारणात आले त्यानंतर त्यांची मुलगी सुप्रिया सुळे, पुतणे अजित पवार देखील ओघाओघाने राजकारणात आणले. त्यामुळे त्यांच्या घराण्याला महाराष्ट्राच्या राजकारणाचा वारसा मिळाला असं म्हणायला हरकत नाही. शरद पवारांशी सांगू तेवढ्या गोष्टी कमीच आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत आणि सत्तासंघर्षात त्यांचा राजकारणातील दांडगा अनुभव आणि त्याची चाणक्यनीती आपल्या सर्वांनाच पाहायला मिळाली. शरद पवार हे एक असे व्यक्तिमत्व आहे ज्यांना बारामती ते दिल्ली संसद हा प्रवास आपल्या हुशारीच्या, बुद्धिमत्तेच्या जोरावर अगदी सहजपणे पार केला.

जाणून घेऊया त्यांच्या या प्रवासाबद्दल '10' आश्चर्यकारक गोष्टी :-

1. पवारांचा जन्म 12 डिसेंबर 1940 रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती येथे झाला. त्यांचे छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे तीन आदर्श आहेत.

2. विद्यार्थी संघटनेच्या एका समारंभासाठी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना आमंत्रित केले.पवारांनी त्याप्रसंगी केलेल्या भाषणामुळे यशवंतराव चव्हाण अतिशय प्रभावीत झाले.त्यानंतर चव्हाणांच्या सांगण्यावरून पवारांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला. वयाच्या २४ व्या वर्षी ते महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यानंतर यशवंतराव चव्हाणांचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले. महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली होती ऑफर: शरद पवार यांचा गौप्यस्फोट

3. 1966 साली पवारांना युनेस्को शिष्यवृत्ती मिळाली.त्याअंतर्गत त्यांना पश्चिम जर्मनी, फ्रान्स, इटली, इंग्लंड इत्यादी देशांना भेट देऊन तेथील राजकीय पक्षांचा आणि त्यांच्या पक्षबांधणी करायच्या पद्धतीचा जवळून अभ्यास करता आला.

4. 18 जुलै 1978 रोजी शरद पवारांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. पवार महाराष्ट्राचे सर्वांत तरुण मुख्यमंत्री ठरले.

5. 1991 मध्ये पी. व्ही. नरसिंह राव आणि अर्जुनसिंग यांच्याबरोबर पवारांचे नावही पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहे अशा बातम्या वर्तमानपत्रांत आल्या. मात्र काँग्रेस संसदीय पक्षाने राव यांना नेतेपदी निवडले.

6. नरसिंह रावांनी पवारांना केंद्रीय मंत्रिमंडळात संरक्षणमंत्री म्हणून नेमले. 26 जून 1991 रोजी त्यांचा केंद्रीय मंत्री म्हणून प्रथमच शपथविधी झाला.

7. 6 मार्च 1993 रोजी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून चौथ्यांदा सूत्रे हाती घेतली. 1995 मध्ये काँग्रेस पक्षाचा राज्यात प्रथमच पराभव झाला आणि शिवसेना-भाजपा युती पहिल्यांदाच सत्तेत आले. मात्र पवारांचे सर्वच पक्षातील नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध राहिले.

8. कालांतराने शरद पवारांनी काँग्रेस पक्ष सोडून 10 जून 1999 रोजी शरद पवारांनी त्यांच्या 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची' स्थापना केली.

9. T-20 स्पर्धा भारतात होऊ शकते, असं BCCIचे अध्यक्ष असताना शरद पवारांना वाटलं. त्यासाठी त्यांनी ललित मोदींना प्रोत्साहन दिलं. भारतामध्ये IPL सुरू झालं याचं श्रेय खरं शरद पवार यांनाच द्यावं लागेल, असं रवी शास्त्री यांनी दिलीप सरदेसाई स्मृती व्याख्यानात म्हटलं होतं.

10. 2017 साली त्यांना पद्मविभूषण हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा नागरी सन्मान देऊन गौरवण्यात आले.

राजकारणात तसेच आपल्या खाजगी आयुष्यातही आपल्या समोर अनेक संकटांना शरद पवार यांनी जराही न डगमगता मात केली. राजकारणात मुरलेल्या अशा मातब्बर, हुशार, धडाडी, नेत्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💐💐

Post Bottom Ad

#

Pages