😱धक्कादायक घटना...मेल आयडी हॅक करून अज्ञात भामट्याने कंपनीला नोकरीचा राजीनामा पाठविल्याने एकाची नोकरी गेली - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Thursday, December 5, 2019

😱धक्कादायक घटना...मेल आयडी हॅक करून अज्ञात भामट्याने कंपनीला नोकरीचा राजीनामा पाठविल्याने एकाची नोकरी गेली💁‍♂कारच्या शोरूममध्ये अनेक वर्षांपासून असणारी नोकरी अज्ञात भामट्याने केलेल्या एका मेलमुळे गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शोरूमवरून तुम्ही नोकरी सोडल्याचे सांगितल्यानंतर हा प्रकार समजला आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात औंध परिसरात राहणार्‍या एका 46 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात भामट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🚨पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,
फिर्यादी हे लष्कर परिसरातील एका नामांकित अशा कारच्या शोरूममध्ये नोकरीस होते. गेली अनेक वर्ष ते याठिकाणी नोकरी करत होते. मात्र, काही दिवसांपुर्वी त्यांचा मेल आयडी हॅक करून अज्ञाताने कंपनीला नोकरीचा राजीनामा पाठविला. कंपनीनेही त्यांनीच मेल पाठविला असल्याचे समजून त्यांचा राजीनामा मंजूर केला. राजीनामा मंजूर झाल्यानंतर फिर्यादींना नोकरी सोडल्याचे आणि राजीनामा दिल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी याबाबत शहानिशा केली. यावेळी त्यांनी आपण असा राजीनाम्याचा मेल केलाच नसल्याचे समोर आले. त्यांनी कंपनीलाही ही माहिती कळवली. त्यानंतर अज्ञाताने मेल हॅककरून हा राजीनामा पाठविल्याचे समोर आले. यानंतर त्यांनी पोलीसांकडे जाऊन तक्रार दिली. अधिक तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत.

Post Bottom Ad

#

Pages