😱खासगी बसने रस्ता ओलांडणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाला चिरडले; सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Friday, December 6, 2019

😱खासगी बसने रस्ता ओलांडणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाला चिरडले; सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद💁‍♂पुण्यात खासगी बसने रस्ता ओलांडणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाला चिरडल्याची घटना गुरूवारी रात्री घडली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. द्वारकाधीश ट्रव्हलचा चालक दिलीप विठ्ठल चव्हाण यास पोलिसानी ताब्यात घेतले आहे. मयत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही.

🚨पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
गुरूवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दांडेकर पुलावरून शिवाजीनगरच्या दिशेने ( M H 18, BG 9500) द्वारकधीश ट्रॅव्हलची बस जात होती. ही बस नवी पेठ येथील गांजवे चौकादरम्यान आली असताना. एक ज्येष्ठ नागरिक रस्ता ओलांडत होते, त्यावेळी बसने पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यामध्ये ती व्यक्ती चाकाखाली येऊन, जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर याप्रकरणी चालकास ताब्यात घेण्यात आले असून तपास करण्यात येत आहे. तसेच अद्याप पर्यंत जेष्ठ नागरिकांची ओळख पटली नसल्याचे विश्रामबाग पोलिसांकडून सांगण्यात आले.

Post Bottom Ad

#

Pages