😱पुणे जिल्ह्यातील ब्रिटिशकालीन पूल आज पहाटेच्या सुमारास कोसळला - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Monday, December 16, 2019

😱पुणे जिल्ह्यातील ब्रिटिशकालीन पूल आज पहाटेच्या सुमारास कोसळला


😱पुणे जिल्ह्यातील ब्रिटिशकालीन पूल आज पहाटेच्या सुमारास कोसळला
तळेगावहून एमआयडीसीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील आंबी येथील ब्रिटिशकालीन पूल आज पहाटेच्या सुमारास अचानक कोसळला, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पूल कोसळल्याने पुणे जिल्ह्यातील १५ गावांचा संपर्क तुटला आहे.
पुलावरील अवजड वाहतूक पाच वर्षांपासून बंद करण्यात आली होती. पुलाला धोकादायक पूल म्हणून देखील संबंधित प्रशासनाने जाहीर केले होते. मोठ्या वाहनांना त्या पुलावरून बंदी घातली होती. एवढेच नाहीतर प्रशासनाने अडथळे देखील बसवले होते. हे अडथळे जेसीबीच्या सहाय्याने तोडून वाहनाची ये-जा चालू होती. पुलावरून अवजड वाहतुकीला बंदी असताना देखील वाहनचालक पुलावरून वाहतूक करत होते.   
ब्रिटिशकालीन हा पूल इंद्रायणी नदीवर शंभर वर्षणापूर्वी बांधण्यात आला होता, असे ग्रामस्थांनी सांगितलं आहे. तळेगाव एमआयडीसी असल्याने हजारो नोकरदार या पुलावरून वाहतूक करतात. मात्र, मुख्य रस्त्यावरील हा पूल आज कोसळल्याने आता तळेगाव एमआयडीसीमध्ये जाण्यासाठी मोठा वळसा मारून जावे लागणार आहे. हा पूल आज कोसळन्याच्या आधी या धोकादायक पुलावरून एमआयडीसीमध्ये काम करणार्या कामगारांची बस पुलावरून गेली होती. नशीब बलवत्तर होत म्हणून बस पुढे गेल्यावर पूल कोसळल्याची घटना घडली आहे. अन्यथा, ऑगस्ट २०१६ मध्ये  झालेल्या सावित्री पूल दुर्घटनेची पुनरावृत्ती झाली असती.

Post Bottom Ad

#

Pages