🚨पोलीस महासंचालकांच्या परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवस तर गृहमंत्री अमित शहा तीन दिवस पुण्यात मुक्काम - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Saturday, December 7, 2019

🚨पोलीस महासंचालकांच्या परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवस तर गृहमंत्री अमित शहा तीन दिवस पुण्यात मुक्काम


💁‍♂प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे काल वायुसेनेच्या विमानाने लोहगाव विमानतळावर आगमन झाले. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले.


👉युतीतल्या ब्रेकअपनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच आमने सामने आले. पुण्यातल्या पोलीस महासंचालकांच्या परिषदेसाठी मोदी पुण्यात दाखल झाले. प्रोटोकॉलनुसार नुसते स्वागताचे सोपस्कर उरकुन उद्धव ठाकरे पुन्हा मुंबईला रवाना झाले. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फक्त 10 मिनिटंच एकमेकांसोबत होते अशी माहिती मिळतेय. या 10 मिनिटांदरम्यान त्यांच्यात काय चर्चा झाली याचा तपशील कळू शकला नाही. विशेष म्हणजे मोदींच्या स्वागतासाठी फडणवीस देखील उपस्थित होते.


🚨शभरातील पोलीस महासंचालकांच्या तीन दिवसांच्या परिषदेचं आयोजन यावर्षी पुण्यात करण्यात आलं आहे. या परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवस तर गृहमंत्री अमित शहा तीन दिवस पुण्यात मुक्कामाला असणार आहेत. पुण्यातील पाषाण भागातील पोलीस रिसर्च सेंटर आणि आयसर या दोन संस्थांमध्ये ही तीन दिवसीय परिषद चालणार आहे. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यासोबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल, गुप्तचर विभागाचे प्रमुख अरविंद कुमार, गृविभागातील वरिष्ठ अधिकारी आणि देशातील वेगवगेळ्या राज्यांचे पोलीस महासंचालक उपस्थित राहणार आहेत.

Post Bottom Ad

#

Pages