😱 मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर केमिकलने भरलेल्या टँकरचा भीषण अपघातानंतर टँकरने घेतला पेट - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Thursday, December 19, 2019

😱 मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर केमिकलने भरलेल्या टँकरचा भीषण अपघातानंतर टँकरने घेतला पेट😱 मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर केमिकलने भरलेल्या टँकरचा भीषण अपघातानंतर टँकरने घेतला पेट
मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर ढेकु गावाजवळ केमिकलने भरलेल्या टँकरचा अपघात झाला. या अपघातानंतर टँकरने पेट घेतला. चालकाचा ताबा सुटल्याने लोखंडी रेलिंग तोडून 30 फूट खाली जाणाऱ्या अडोशी रस्त्यावर कोसळला. ही घटना पहाटे 6:30वा.सुमारास घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मुंबईहून पुण्याकडे टँकर जात होता. यामध्ये ज्वलनशिल केमिकल होते. सकाळी 6:30 वाजता ढेकु गावाजवळ एक्सप्रेस वेवर टँकरला अपघात झाला. यानंतर केमिकलने पेट घेतल्यानं टँकरला भीषण आग लागली. टँकर आगीत जळून खाक झाला आहे. चालकाने प्रसंगावधान राखल्याने तो सुखरुप बचावला आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी खोपोली अग्निशामक दलाने धाव घेतली. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून अडोशी रस्त्यावरून जाणारी वाहतुक तात्पुरती बंद करण्यात आली आहे. पहाटेच्या वेळेस हा अपघात झाल्याने इतर कोणतेही नुकसान झालेलं नाही. तसेच चालक सुखरुप असून या अपघातात जिवित हानी झालेली नाही. ज्वलनशिल केमिकलमुळे अपघातानंतर टँकरने पेट घेतल्याचं समजते. या अपघातानंतर अडोशी रस्त्यावरून जाणारी वाहतुक थांबवण्यात आली आहे.

Post Bottom Ad

#

Pages