😱 पुण्यात आठ वर्षाच्या मुलीवर बलात्कार...अज्ञात इसमावर गुन्हा दाखल - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Thursday, December 19, 2019

😱 पुण्यात आठ वर्षाच्या मुलीवर बलात्कार...अज्ञात इसमावर गुन्हा दाखल

😱 पुण्यात आठ वर्षाच्या मुलीवर बलात्कार...अज्ञात इसमावर गुन्हा दाखल

देशामध्ये एकीकडे महिला अत्याचाराच्या घटनांमुळे देश ढवळून निघत असतांना पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात पाषाण येथील मारुतीच्या मंदिरात एका अज्ञात नराधमाने सात वर्ष नऊ महिन्याच्या मुलीला वासनेचा शिकार बनवत बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. या बाबत संबंधित नराधमावर बलात्कार व बाललैंगिक अत्याचाराच्या विविध कलमानुसार चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
पुणे शहर पाषाण परिसरात सोमवार दि. 16 डिसेंबर रोजी पीडित मुलगी घराबाहेर खेळण्यासाठी गेली असतांना सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास मंदिराजवळ खेळत असलेल्या चिमुरडीला नराधमाने मंदिराच्या कोपऱ्यात नेऊन तिला वासनेची शिकार बनवताना तिच्यावर अमानुषपणे तोंड दाबून तिच्यावर बलात्कार केला. तिला त्याने बोचकरल्याचाही प्रकार घडला. या घृणास्पद प्रकाराबद्दल काळा शर्ट आणि निळी पॅन्ट परिधान केलेल्या अज्ञात नराधमाला विरुद्ध बाललैंगिक अत्याचाराच्या विविध कलमानुसार चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात असा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

सदर घटनेप्रकरणी चतुर्शिंगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माया देवरे हे बलात्कारी नारधमाचा शोध घेत पुढील तपास करीत आहे.

Post Bottom Ad

#

Pages