सावरकरांचा अवमान करणाऱ्या वक्तव्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहीररित्या राहुल गांधी यांना जोडे मारावेत रणजीत सावरकरांची संतप्त प्रतिक्रिया - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, December 15, 2019

सावरकरांचा अवमान करणाऱ्या वक्तव्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहीररित्या राहुल गांधी यांना जोडे मारावेत रणजीत सावरकरांची संतप्त प्रतिक्रिया

सावरकरांचा अवमान करणाऱ्या वक्तव्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहीररित्या राहुल गांधी यांना जोडे मारावेत रणजीत सावरकरांची संतप्त प्रतिक्रिया
मी माफी मागणार नाही. माझं नाव राहुल गांधी आहे राहुल सावरकर नाही, या सावरकरांचा अवमान करणाऱ्या वक्तव्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहीररित्या राहुल गांधी यांना जोडे मारावेत, अशी संतप्त प्रतिक्रिया स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर यांनी व्यक्त केली आहे.
रणजीत सावरकर राहुलवर टीका करताना म्हणाले की,
स्वातंत्र्यवीर सावरकर हे महाराष्ट्राचेच नाहीत तर संपूर्ण देशाचे दैवत आहेत. मी राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे, जीव गेला तरीही माफी मागणार नाही असं राहुल गांधी म्हणाले. ही चांगलीच गोष्ट आहे की राहुल गांधी यांचे आडनाव सावरकर नाही. त्यांचे आडनाव सावरकर असते तर आम्हाला तोंड काळे करावे लागले असते.
वीर सावरकर यांनी ब्रिटिशांची कधीही माफी मागितली नाही. त्यामुळे राहुल गांधी यांना जे सुचवायचं आहे त्यामध्ये काहीही तथ्य नाही. पंडित नेहरु यांनी १९४६ मध्ये व्हॉईसरॉय कौन्सिलमध्ये मंत्रिपद मिळावं म्हणून, म्हणजेच सत्तेच्या मोहापायी ब्रिटिशांची आणि जॉर्ज यांच्याशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली होती हे रेकॉर्डवर आहे. पंडित नेहरु यांनी ही शपथ इतक्या निष्ठेने निभावली की देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही म्हणजेच १९५० पर्यंत किंग जॉर्जला पंडित नेहरु हे भारताचा सम्राट मानत होते. भारतातील प्रत्येक निर्णयासाठी त्यांची परवानगी पंडित नेहरु घेत असत. अशी गुलामगिरीची मानसिकता असलेल्या पंडित नेहरुंच्या पणतूकडून वीर सावरकर यांचा अपमान होणं हे स्वाभाविक आहे. त्यांच्या रक्तातच परदेशातली गुलामगिरी भिनली आहे. असा टोमणा रणजीत सावरकर यांनी मारला.

Post Bottom Ad

#

Pages