😱चंदननगर येथील आयआयएफएल गोल्ड फायनान्सच्या कार्यालयात तिघांनी बंदुकीचा धाक दाखवून, लाखो रुपयांचे सोने लुटले - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Thursday, December 5, 2019

😱चंदननगर येथील आयआयएफएल गोल्ड फायनान्सच्या कार्यालयात तिघांनी बंदुकीचा धाक दाखवून, लाखो रुपयांचे सोने लुटले💁‍♂पुण्यातील चंदननगर येथील ‘आयआयएफएल’ गोल्ड फायनान्सच्या कार्यालयात तिघांनी बंदुकीचा धाक दाखवून, लाखो रुपयांचे सोने लुटल्याची घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. नेमके किती लाखांचे सोने लुटले  गेले आहे, याबाबत अद्याप माहिती मिळाली नसल्याचे चंदननगर पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

🚨पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार,
पुणे-नगर रोडवरील भाजी मार्केटजवळ असलेल्या आनंद इम्पायर इमारतीमध्ये ‘आयआयएफएल’ गोल्ड फायनान्स कंपनीचे कार्यालय आहे. या कार्यालयात आज (गुरूवार) सकाळी पावणे अकरा वाजेच्या सुमारास सर्व कर्मचारी काम करत असताना. तिघेजण कार्यालयात शिरले यानंतर त्यांनी बंदुकीचा धाक दाखवत. लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने लुटल्याची घटना घडली.

Post Bottom Ad

#

Pages