😱डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे चुकीच्या इंजेक्शने पाच बालके अत्यवस्थ - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, December 15, 2019

😱डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे चुकीच्या इंजेक्शने पाच बालके अत्यवस्थ

😱डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे चुकीच्या इंजेक्शने पाच बालके अत्यवस्थ

उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या पाच बालकांना चुकीचे इंजेक्शन देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये उघडकीस आला. चुकीच्या इंजेक्शनमुळे पाच बालकांना ‘रिऍक्शन’ झाल्याने ही सर्व बालके बेशुद्ध पडून ‘कोमा’मध्ये गेली. ही गंभीर घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली असून, या पाचही बालकांना पुढील उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले आहे. सीपीआरमध्ये त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. त्याच्यासाठी डॉक्टराचे विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. हा प्रकार गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच घडल्याचा आरोप बालकांच्या नातेवाईकांनी केला आहे.

1) चैतन्य सुनील खवरे (वय 9, रा. महागाव, ता. गडहिंग्लज)
2) समर्थ रामचंद्र कोल्हे (वय 4, रा. अलबादेवी, अडकूर, ता. चंदगड)
3) रोहित काशिनाथ शेषनाईक (वय 10, रा. दुंडगे, ता. गडहिंग्लज)
4) सर्वेश दिगंबर पाटील (वय 4, रा. गवसे, ता. आजरा)
5) समर्थ बाबुराव गुरव (वय 8, रा. खानापूर, ता. आजरा)
अशी पाच बालकांची नावे आहेत.
या सर्व बालकांच्यावर सीपीआरमध्ये कोयनामधील अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. या पाच जणांपैकी एका बालकाची प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती या बालकांच्यावर उपचार करणाऱया वैद्यकीय अधिकाऱयांनी दिली.

प्राप्त मिळालेल्या माहितीनुसार,
सरकारच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत अंगणवाडीमधील बालकांची वर्षातून दोन वेळा आणि शाळा व हायस्कूलमधील मुला-मुलींची एक वेळ वैद्यकीय तपासणी केली जाते. ही वैद्यकीय तपासणी कुपोषण पुनर्वसन केंद्राच्या (एनआरसी) पथकातील डॉक्टरकडून केली जाते. तपासणीदरम्यान हर्निया, लघुशंकेची तक्रार, हृदयविकार आदी व्याधी असलेल्या बालकांवर सरकारकडून मोफत शस्त्रक्रिया केली जाते. त्यापैकी काही शस्त्रक्रिया या गडहिंग्लज उपजिल्हा रुगणालयात तर काही शस्त्रक्रिया कोल्हापूर सीपीआर, इचलकरंजी आयजीएम इस्पितळामध्ये केल्या जातात. काही दिवसापूर्वी गडहिंग्लज, आजरा, चंदगड या तीन तालुक्यातील बालकांची कुपोषण पुनर्वसन केंद्रामार्फत वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. या तपासणीवेळी आढळून आलेल्या बालकांपैकी चैतन्य खवरे, समर्थ कोल्हे, रोहित शेषनाईक, सर्वेश पाटील, समर्थ गुरव या पाच बालकांवर हर्निया, लघुशंकेच्या तक्रारीबाबत शस्त्रक्रिया करण्यासाठी गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या सर्व बालकांवर शुक्रवारी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. शस्त्रक्रियेनंतर त्या बालकांवर रुग्णालयातील बालकांच्या वॉर्डात उपचार सुरु होते. शनिवारी पहाटेच्या सुमारास शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या सर्व बालकांना डॉक्टरांनी इंजेक्शन दिले. इंजेक्शननंतर काही वेळात बालकांचे बोलणे बंद होवून ती बेशुद्ध पडली. हा प्रकार नातेवाईकांच्या निदर्शनास येताच त्यांनी रुग्णालयातील डॉक्टरांना त्याबाबत माहिती दिली. तोपर्यंत बालकांची प्रकृती चिंताजनक बनल्याने पालक संतप्त बनले. रुग्णालयात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

तातडीने सीपीआरला हलविले...
घडलेल्या घटनेची माहिती रुग्णालयाच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱयांना मिळाल्यानंतर त्यांनी त्वरीत रुग्णालयात धाव घेतली. त्या सर्व बालकांना पुढील उपचाराकरीता सीपीआरमध्ये दाखल केले. या पाचही बालकांच्यावर सीपीआरमधील बालरोग विभागाच्या अतिदक्षता वॉर्डमध्ये उपचार सुरु आहेत. पाचपैकी चार बालकांची प्रकृती सुधारत असून एका बालकाची अद्यापी चिंताजनक आहे, अशी माहिती सीपीआरच्या वैद्यकीय अधिकाऱयांनी दिली.

ढिसाळ कारभार चव्हाटय़ावर
गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात हर्निया, लघुशंकेच्या तक्रारीविषयी शस्त्रक्रिया झालेल्या पाच बालकांना चुकीच्या पद्धतीने इंजेक्शन देण्यात आले. त्यामुळे त्या सर्व बालकांची प्रकृती चिंताजनक बनली. या प्रकाराने या उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचा ढिसाळ कारभार चव्हाटय़ावर आला आहे.

दोषी डॉक्टरवर कारवाईची मागणी :-
उपजिल्हा रुग्णालयातील ज्या डॉक्टराने या पाच बालकांना चुकीचे इंजेक्शन देऊन, त्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केला. त्या डॉक्टरची खातेनिहाय चौकशी करुन चौकशीअंती त्यांच्यावर त्वरीत कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी बालकांच्या पालकांनी केली.

Post Bottom Ad

#

Pages