⚖पेन्टींगच्या कामाचे पैसे न दिल्याने डोक्‍यात फरशी मारून खून करणाऱ्याला जन्मठेप आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा; अतिरिक्त सत्र न्यायालय - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Tuesday, December 3, 2019

⚖पेन्टींगच्या कामाचे पैसे न दिल्याने डोक्‍यात फरशी मारून खून करणाऱ्याला जन्मठेप आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा; अतिरिक्त सत्र न्यायालय


💁‍♂ मामाने केलेल्या पेन्टींगच्या कामाचे पैसे न दिल्याने डोक्‍यात फरशी मारून खून करणाऱ्याला जन्मठेप आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी.पी.अग्रवाल यांनी दिला आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त तीन महिने कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

👉राहुल ऊर्फ उद्दल जगतबली सिंग (वय 24, रा. आश्रफनगर, कोंढवा) असे जन्मठेप झालेल्याचे नाव आहे. त्याला अविनाश ऊर्फ शिवा मधुकर जाधव (वय 29, रा. कोंढवा बुद्रुक) यांच्या खून प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली आहे. याबाबत अविनाश यांची पत्नी आशा (वय 27) यांनी कोंढवा पोलिसात फिर्याद दिली आहे. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील सुनील मोरे यांनी काम पाहिले. त्यांनी 8 साक्षीदार तपासले.

🚨ही घटना 19 एप्रिल 2015 राजी कोढवा, आश्रपनगर येथे घडली. अविनाश पेन्टीगची कामे घेत असत. ती इतरांना कामाला लावून करवून घेत असत. राहुल याच्या मामाचे पेन्टीगचे पैसे राहिले होते. या कारणावरून त्याने अविनाश यांना लाथाबुक्‍क्‍यांनी जोरात मारहाण केली. त्यानंतर डोक्‍यात फरशी मारून जबर जखमी केले. रक्तस्राव होत असल्याने पोलिसांनी रुग्णवाहिकेतून अविनाश यांना ससुन रुग्णालय दाखल केले. उपचारापूर्वीच ते मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Post Bottom Ad

#

Pages