🤼‍♂लोणावळ्यात पर्यटकांना लष्करी प्रशिक्षण देणारा देशातील पहिलाच उपक्रम - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Saturday, December 7, 2019

🤼‍♂लोणावळ्यात पर्यटकांना लष्करी प्रशिक्षण देणारा देशातील पहिलाच उपक्रम💁‍♂आजकाल दहशतवादी हल्ले कधी आणि कुठे होतील, याचा काही नेम नाही. त्यामुळे कायम सतर्क रहावे लागते. केवळ असे हल्लेच नव्हे, तर अनेकदा नैसर्गिक पूर,आगीच्या घटना अशा आकस्मिक संकटांशी सामना करण्याचीही वेळ येते. अशा प्रसंगी घाबरून न जाता स्वतःचा आणि इतरांचा बचाव कसा करायचा, याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण प्रत्येकालाच मिळायला हवे. हीच निकड लक्षात घेऊन डेला समूहाचे प्रमुख जिमी मिस्त्री यांनी लोणावळ्यामध्ये राजमाची किल्ल्याजवळ उदेवाडी येथे शिरोता धरणाच्या काठावर तीन एकराच्या परिसरात डेटाच्या रुपाने या प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अशा पद्धतीचा पर्यटकांना लष्करी प्रशिक्षण देणारा देशातील हा पहिलाच उपक्रम आहे.


👉26/11 ला मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात शेकडो निरपराध लोक शहीद झाले. त्यामुळे व्यथित झालेल्या जिमी मिस्त्री यांनी या घटनेचा सामना कसा करावा, याचे प्रशिक्षण नागरिकांना देण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणले. राष्ट्रीयत्वाची भावना जागी करण्याच्या उद्देशाने या तरुण उद्योजकाने हा उपक्रम हाती घेतला आहे. येथील प्रशिक्षण अधिक परिणामकारक आणि शास्त्रशुद्ध होण्याचे मुख्य कारण म्हणजे इथे उभी केलेली लष्करातील निवृत्त अधिकाऱयांची भक्कम फळी. लष्कराच्या सदर्न कमांडचे माजी प्रमुख निवृत्त लेफ्टनंट जनरल रेमंड नऱहोना यांच्या नेतृत्वाखाली जवानांची तरुण तुकडी येथे प्रशिक्षण देते. प्रत्यक्ष दहशतवाद्यांचा खात्मा करणारे ब्लॅक कॅट कमांडोदेखील या तुकडीत आहेत. याअंतर्गत तोल सांभाळत पाईपवरून चालणे, भिंत ओलांडणे, क्रॉलिंग करत पुढे सरकणे, दोरीवर चढणे, दोरीच्या सहाय्याने तयार केलेला पूल ओलांडणे, आगीतून चालणे असे 19 प्रकारचे अडथळे पार करण्याचे प्रशिक्षण येथे दिले जाते. त्याचप्रमाणे अतिरेक्मयांकडून अचानक गोळीबार झाल्यास गर्भगळित न होता स्वतःचा बचाव कसा करावा याचे तंत्रही येथे शिकविण्यात येते. या सर्वांना प्रशिक्षण देण्यासाठी एक ते दोन दिवस कालावधीचे विविध कार्यक्रम येथे राबविण्यात येतात. जिमी मिस्री यांची ही कल्पना आता हळूहळू लोकप्रिय होऊ लागली असून डेला रिसॉर्टला येणारे अनेक पर्यटक डेटालाही भेट देत आहेत. डेटाच्या प्रशिक्षण कार्यक्रमात लहान मुले, कुटुंब आणि वेगवेगळय़ा कंपन्यांमधील अधिकारी वर्गासाठी स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहेत. गुगलसारख्या अनेक मोठय़ा कंपनीतील अधिकाऱयांनी येथे प्रशिक्षण घेतले आहे. या ऍकॅडमीला सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, माधुरी दीक्षित, आदित्य ठाकरे, विश्वास नांगरे पाटील यांच्यासह अनेकांनी भेट दिली आहे.

🗣 डेटाची संकल्पना प्रत्यक्षात आली, याचा मला विशेष आनंद आहे. कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत त्या प्रसंगाला धीराने तोंड देण्यासाठी व त्यातून आपला व इतरांचा बचाव करण्यासाठी प्रत्येक पुरूष, महिला आणि मुलांना प्रशिक्षित करणे, हे आमचे उद्दिष्ट असल्याचे जिमी मिस्त्री यांनी सांगितले.

Post Bottom Ad

#

Pages