♿पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागातर्फे दिव्यांग मेळाव्याचे आयोजन - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Tuesday, December 3, 2019

♿पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागातर्फे दिव्यांग मेळाव्याचे आयोजन💁‍♂ आज जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधत पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागातर्फे पुणे शहरातील दिव्यांग व्यक्तींसाठी मंगळवार दिनांक 3 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 11:00 ते दुपारी 3:00 वा. लोक शाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह, बिबवेवाडी, पुणे याठिकाणी दिव्यांग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.


👉दिव्यांग मेळाव्याच्या आयोजनात पुणे शहराचे प्रथम नागरिक पुणे महापौर मा.श्री. मुरलीधर मोहोळ, पुणे महापालिका आयुक्त मा. श्री. सौरभ राव, पुणे महापालिका उपायुक्त मा. श्री. नितीन उदास, पुणे महानगरपालिका उप महापौर मा. सौ. सरस्वतीताई शेंडगे, आमदार विधानसभा सदस्य व पुणे महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्ष मा. श्री. सुनील कांबळे, नगरसेविका सौ. राणीताई भोसले, मा. सौ. रूपालीताई धाडवे,  मा. सौ. दिशा माने, नगरसेवक मा. श्री. राजेंद्र शिळीमकर कार्यक्रमात उपस्थित होते.

♿ जागतिक दिव्यांग मेळाव्याच्या आयोजनात पुणे शहरातील दिव्यांग खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटर श्री. कुणाल फणसे, नेमबाजी श्री. आकाश कुंभार, क्रीडा मार्गदर्शक-कबड्डी श्री. सागर खळदकर यांच्या मा. महापौर, मा. महानगरपालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका मा. उपमहापौर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सामाजिक विकास विभाग उपायुक्त श्री सुनील इंदलकर यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावना व सादर केली तसेच पुणे महानगरपालिकेतर्फे दिव्यांगसाठी असणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली.

◼ पुणे महानगरपालिकेचे महापौर मा. श्री. मुरलीधर मोहोळ यांनी दिव्यांगांसाठी येणार्‍या पुढच्या काळामध्ये एकत्र बसून संवाद साधून जे-जे मागणी व प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. दिव्यांग समाजाचा एक भाग असून आम्ही दिव्यांगांच्या पाठीशी सदैव आहोत. दिव्यांग समाजाच्या विकासासाठी एकत्र येऊन विकासात्मक काम केले जाईल तसेच दिव्यांग क्रीडा प्रशिक्षक श्री. सागर खळदकर यांचा अपघाताने त्यांना अपंगत्व आले होते, मात्र त्यांनी जिद्द न सोडता अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडविले आहेत. त्यांच्या जिद्दीला सलाम करत त्यांचे कौतुक केले. दिव्यांग समाज बांधवांसाठी जे करता येईल ते योगदान करण्याचा प्रयत्न नेहमीच करत राहील, असे त्यांनी कार्यक्रमात सांगितले.


◼ पुणे महापालिका आयुक्त मा. श्री. सौरव राव यांनी दिव्यांगसाठी महानगर पालिकेमध्ये विशेष बजेट व त्यानुसार योजना राबवण्याचा अभ्यास करून पुढील बजेटमध्ये दिव्यांगांसाठी विशेष तरतूद करण्यात येणार असल्याचे सांगितले.


◼ मेळावा कार्यक्रमात दिव्यांग सत्कारार्थी खेळाडू श्री. कुणाल फणसे, श्री. आकाश कुंभार, श्री. सागर खळदकर यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना दिव्यांग विद्यार्थ्यांनी खचून न जाता आत्मविश्वासाने खेळामध्ये पुढे येण्यासाठी प्रयत्न करावेत असे सांगितले. दिव्यांग मेळाव्याच्या कार्यक्रमात वैद्यकीय सेवा, दिव्यांगासाठी रोजगार, प्रशिक्षणाच्या संधी, दिव्यांग व्यक्ती अधिनियम 2016 माहिती,  उद्योगाच्या संधी,  शासनाच्या योजना याबाबत विविध त्या-त्या क्षेत्रातील तज्ञांनी दिव्यांग बंधूंचे मार्गदर्शन केले. दिव्यांग मेळावा प्रसंगी महाराष्ट्र दृष्टिहीन कल्याण संघ यांच्यावतीने बहारदार संगीत गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला होता. दिव्यांग मेळाव्याच्या कार्यक्रमात विविध संघटनेचे पदाधिकारी, दिव्यांग व असंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Bottom Ad

#

Pages